IPL 2023 Final : इतिहासात पहिल्यांदाच 'रिझर्व्ह डे'ला रंगणार फायनल सामना; 'ही' असेल दोन्ही टीमची प्लेईंग 11

IPL 2023 Final : पावसाच्या व्यत्ययामुळे आयपीएलची फायनल राखीव दिवस म्हणजे रिझर्व्ह डेच्या दिवशी ठेवण्यात आली आहे. गुजरात टायटन्स ( Gujarat Titans ) विरूद्ध चेन्नई सुपर किंग्ज ( Chennai Super Kings ) यांच्यात  फायनल सामना होणार आहे. 

Updated: May 29, 2023, 03:44 PM IST
IPL 2023 Final : इतिहासात पहिल्यांदाच 'रिझर्व्ह डे'ला रंगणार फायनल सामना; 'ही' असेल दोन्ही टीमची प्लेईंग 11 title=

IPL 2023 Final : आयपीएल इतिहासात (IPL History) पहिल्यांदाच असं घडलंय, ज्यामध्ये स्पर्धेची फायनल राखीव दिवस म्हणजे रिझर्व्ह डेच्या दिवशी ठेवण्यात आली आहे. गुजरात टायटन्स ( Gujarat Titans ) विरूद्ध चेन्नई सुपर किंग्ज ( Chennai Super Kings ) यांच्यात होणारा फायनल सामना रविवारी म्हणजेच काल खेळवण्यात येणार होता. मात्र पावसाच्या व्यत्ययामुळे हा सामना रिझर्व्ह डे ( IPL 2023 Final On Reserve day ) म्हणजेच आज खेळवला जाणार आहे. 

28 मे रोजी पावसाने अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर अगदी धुमाकूळ घातला. संपूर्ण सामना या पावसाने धुवून निघाला. काल न होऊ शकलेला हा सामना आज रंगणार आहे. आजच्या या सामन्यामध्ये दोन्ही टीम्सची प्लेईंग 11 कशी असेल यावर एक नजर टाकूया.

गतविजेती गुजरात टायटन्स ( Gujarat Titans ) आजच्या फायनल सामन्यात 4 वेळा आयपीएलच्या ट्रॉफीवर नाव कोरणाऱ्या चेन्नई सुपर किंग्ज ( Chennai Super Kings ) सोबत लढणार आहे. दुसऱ्यांदा जेतेपद पटकावण्यासाठी हार्दिक पंड्या पूर्ण प्रयत्न करणार आहे. यावेळी हार्दिक टीममध्ये बदन न करण्याची शक्यता आहे. त्यामुळे कर्णधार मुंबई इंडियन्सविरूद्धच्या ( Mumbai Indians ) प्लेईंग 11 सोबत चेन्नईविरूद्ध मैदानात उतरणार आहे. 

गुजरातच्या टीमचं संभाव्य प्लेइंग - 11 :

शुभमन गिल/जोशुआ लिटिल, वृद्धिमान साहा (विकेटकीपर), साई सुदर्शन, हार्दिक पांड्या (कप्तान), विजय शंकर, डेविड मिलर, राशिद खान, मोहित शर्मा, मोहम्मद शमी, राहुल तेवतिया, नूर अहमद

चेन्नई सुपर किंग्जची टीम कशी असणार?

आयपीएलमध्ये यंदाच्या सिझनमध्ये चेन्नईच्या टीमची सुरुवात फारशी चांगली झाली नव्हती. मात्र त्यानंतर सीएसकेने कमबॅक करत थेट फायनल गाठलं आहे. फायनलच्या सामन्यासाठी धोनीही टीममध्ये बदल करू इच्छिणार नाही. ज्या टीममुळे तो फायनलमध्ये पोहोचलाय, त्याच टीमसोबत धोनी फायनल खेळू शकतो.

चेन्नई सुपर किंग्सच्या टीमचं संभाव्य प्लेईंग - 11 :

ऋतुराज गायकवाड,डेवोन कॉन्वे, शिवम दुबे/मतीशा पथिराना, अजिंक्य रहाणे, मोईन अली, अंबाती रायडू, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (कर्णधार आणि विकेटकीपर), तुषार देशपांडे, महीश तीक्ष्णा, दीपक चाहर