IPL 2023 : दिल्ली विरुद्ध हैदराबादमध्ये रंगणार लढत, अशी असेल संभाव्य Playing 11

SRH vs DC : आयपीएलच्या (IPL 2023) स्पर्धेचा 34 वा सामना SRH विरुद्ध DC यांच्यात आज संध्याकाळी 07:30 वाजता राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियम, हैदराबाद येथे खेळवला जाईल. या सामन्यामध्ये कोणाचा विजय होणार हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे. 

श्वेता चव्हाण | Updated: Apr 24, 2023, 09:38 AM IST
IPL 2023 : दिल्ली विरुद्ध हैदराबादमध्ये रंगणार लढत, अशी असेल संभाव्य Playing 11  title=
IPL 2023 SRH vs DC Dream11 Prediction

SRH vs DC Dream11 Prediction : आज आयपीएलमध्ये (IPL 2023) दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायजर्स हैदराबाद (DC vs SRH) हे दोन्ही संघ आमने-सामने असणार आहेत. आजचा सामना हैदराबादमधील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय मैदानात पार पडणार आहे. गुणतालिकेचा विचार करता नवव्या स्थानी असलेल्या हैदराबादला आजचा विजय पुढील फेरीत एन्ट्रीसाठी महत्त्वाचा आहे. तर दिल्ली ही दहाव्या स्थानी असल्याने त्यांनाही स्पर्धेतील आव्हान जिंकण्यासाठी आजचा विजय मिळवणं महत्त्वाचा आहे. 

आयपीएलमध्ये आतापर्यंत दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायजर्स हैदराबाद (Delhi Capitals vs sunrisers hyderabad) हे संघ तब्बल 21 वेळा एकमेंकाविरुद्ध मैदानात उतरले आहेत. या सर्व सामन्यांचा विचार करता हैदराबादचं पारड काहीस जड राहिले आहे. हैदराबादने 21 पैकी 11 सामने जिंकले असून दिल्ली संघाला 10 सामने जिंकण्यात यश मिळाले आहेत. तर दुसरीकडे अॅडम मार्करामच्या नेतृत्वाखालील सनरायझर्स हैदराबादला गेल्या सलग दोन सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला आहे. शतक झळकावण्याव्यतिरिक्त हॅरी ब्रूक्स या मोसमात काही विशेष करू शकला नाही. त्याचवेळी अभिषेक त्रिपाठी आणि खुद्द कर्णधार मार्कराम यांची बॅट अपेक्षेप्रमाणे खेळी खेळली नाही.

वाचा : मास्टर ब्लास्टर Sachin Tendulkar नावाचा अर्थ माहितीये का तुम्हाला?

हवामान आणि खेळपट्टीचा अहवाल

हैदराबादमधील हवामान आज अंशतः ढगाळ राहील पण पावसाची शक्यता नाही. तापमान 29.69 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. तसेच गेल्या काही सामन्यांवर नजर टाकली तर हैदराबादच्या राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडियमची खेळपट्टी फलंदाज आणि गोलंदाज दोघांनाही अनुकूल वाटत आहे. या खेळपट्टीवर पहिल्या डावात फलंदाजी करणे सोपे दिसत आहे. मागील काही सामन्यांनुसार या खेळपट्टीवर पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या 170 धावांची आहे. तर दुसऱ्या डावातील सरासरी धावसंख्या 145 धावांची आहे.

SRH vs DC संभाव्य प्लेईंग 11

सनरायझर्स हैदराबाद : हॅरी ब्रूक्स, अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, अॅडम मार्कराम, हेनरिक क्लासेन, मयंक अग्रवाल, मार्को जॅनसेन, वॉशिंग्टन सुंदर, भुवनेश्वर कुमार, मयंक मार्कंडे, उमरान मलिक.

दिल्ली कॅपिटल्स : डेव्हिड वॉर्नर, पृथ्वी शॉ, मिचेल मार्श, फिलिप सॉल्ट, मनीष पांडे, अक्षर पटेल, ललित यादव, कुलदीप यादव, एनरिक नोर्किया, इशांत शर्मा, मुकेश कुमार.