IPL 2024 Dhoni RCB Offer: इंडियन प्रीमिअर लीग म्हणजेच आयपीएलचं 2024 चं पर्व सुरु होण्याआधीच मुंबई इंडियन्सचा कर्णधार बदलण्यात आला. रोहित शर्माकडून नेतृत्व काढून घेत गुजरात टायटन्समधून पुन्हा स्वगृही परतलेल्या हार्दिक पंड्याकडे संघाचं नेतृत्व सोपवण्यात आलं आहे. असं असतानाच आता रोहित शर्मा दुसऱ्या संघाकडून खास करुन चेन्नई सुपर किंग्जकडून खेळणार की काय अशी शंका उपस्थित केली जात आहे. एकीकडे ही चर्चा सुरु असतानाच एका जाहीर कार्यक्रमामध्ये थेट महेंद्र सिंग धोनीला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघासाठी खेळण्याची मागणी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे धोनी समोर असतानाचा त्याला ही ऑफर देण्यात आली. त्यावर धोनीने तिथेच या मागणीवर दिलेलं उत्तर ऐकून उपस्थितांनी टाळ्या वाजवून त्याच्या उत्तरला दाद दिली.
एका जाहीर कार्यक्रमामध्ये एका तरुणाने धोनीकडे एक मागणी केली. "मी मागील 16 वर्षांपासून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा कट्टर चाहता आहे. तू चेन्नई सुपर किंग्जला 5 वेळा जेतेपद मिळवून दिलं आहे. म्हणूनच माझी अशी इच्छा आहे की तू आरबीला पाठिंबा द्यावा आणि आमच्यासाठी एक चषक जिंकून द्यावा," असं एका चाहत्याने जाहीर कार्यक्रमामध्ये धोनीकडे साकडं घातलं.
"तो संघ (आरसीबी) फार चांगला आहे. मात्र क्रिकेटमध्ये सर्व काही ठरवल्याप्रमाणे होत नाही. जर आपण आयपीएलबद्दल बोललो तर असं दिसून येईल की पूर्ण क्षमतेनं संघ असेल तर सर्व शक्तीशाली खेळाडू असतात. सर्व संघ शक्तीशाली असतात. तुमच्या संघातील एखादा खेळाडू जायबंदी झाल्याने किंवा इतर कारणाने खेळू शकत नाही तेव्हा खरी अडचण निर्माण होते. तो फारच उत्तम संघ आहे," असं धोनीने आरसीबीबद्दल बोलताना म्हटलं.
MS Dhoni's response to a RCB fan.
- MS is a gem..!!!pic.twitter.com/qQn4DWtGZk
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) December 20, 2023
"आयपीएलमध्ये सर्वांना समान संधी असते. आताची स्थिती पाहिल्यास मला स्वत:च्या संघाबद्दलच्या अनेक समस्यांना तोंड द्यायचं आहे. त्यामुळे मला प्रत्येक संघाला उत्तम कामगिरी करण्यासाठी शुभेच्छा द्यायच्या आहेत. मात्र या शिवाय मी इतर काहीही करु शकत नाही. कारण तुम्ही विचार करा की मी आऊट ऑफ द वे जाऊन इतर कोणत्या तरी संघाला समर्थन करण्याचा प्रयत्न केला तर आमच्या चाहत्यांना काय वाटेल. तुला स्वत:ला काय वाटेल," असं उत्तर धोनीने दिलं.
IND
(13 ov) 64/1 (151 ov) 587
|
VS |
ENG
407(89.3 ov)
|
Full Scorecard → |
AUS
(6 ov) 12/2 (66.5 ov) 286
|
VS |
WI
253(73.2 ov)
|
Full Scorecard → |
HUN
(19.2 ov) 149
|
VS |
FRA
97(15.3 ov)
|
Hungary beat France by 52 runs | ||
Full Scorecard → |
MLT
(20 ov) 148/9
|
VS |
AUT
101(17.5 ov)
|
Malta beat Austria by 47 runs | ||
Full Scorecard → |
BEL
(8 ov) 141/1
|
VS |
ROM
78/6(8 ov)
|
Belgium beat Romania by 63 runs | ||
Full Scorecard → |
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.