IPL 2024 MI vs CSK Head to Head Records: इंडियन प्रिमिअर लीगमधील एक हाय व्होल्टेज सामना आज मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर पार पडणार आहे. आयपीएल 2024 मधील 29 व्या सामन्यामध्ये आज हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सचा संघ मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्जशी भिडणार आहे. पारंपारिक प्रतिस्पर्धी असलेल्या या दोन्ही संघांमधील रंगतदार सामन्याबद्दल चाहत्यांमध्ये बरीच उत्सुकता आहे. यापूर्वी हे संघ किती वेळा एकमेकांसमोर आले आहेत. त्यापैकी कोणी किती सामने जिंकलेत? आजच्या सामन्याआधी खेळपट्टी काय सांगते? नाणेफेक जिंकल्यावर प्रथम गोलंदाजी घ्यावी की फलंदाजी यासारख्या अनेक प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात...
मुंबई इंडियन्सच्या संघाला सुरुवातीलाच पराभावचे सलग 3 धक्के बसले. मात्र मुंबईच्या संघाने मागील 2 सामन्यांमध्ये विजय मिळवला. पाच सामन्यांमध्ये 2 विजय आणि 3 पराभवांसहीत पॉइण्ट्स टेबलमध्ये संघ सातव्या स्थानी आहे. मात्र या सामन्यामध्ये विजय मिळवून पॉइण्ट्स टेबलमध्ये आपली जागा अधिक भक्कम करण्याचा मुंबईचा प्रयत्न असेल.
दुसरीकडे चेन्नई सुपर किंग्जनेही आपल्या पाच पैकी 3 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. सध्या चेन्नईचा संघ चौथ्या स्थानी आहे. चेन्नईचा संघही मुंबईला मुंबईच्या होम ग्राऊण्डवर धूळ चारण्याच्या इराद्यानेच मैदानात उतरेल यात शंका नाही.
मुंबईच्या संघासाठी आजचा सामना हा घरच्या मैदानावरील सलग चौथा सामना असणार आहे. तर दुसरीकडे चेन्नईच्या संघासाठी हा सलग तिसरा बाहेरच्या मैदानावरील सामना ठरणार आहे. यंदाच्या पर्वामध्ये घरच्या मैदानावर खेळणाऱ्या संघांनी विजय मिळवण्याचं प्रमाण अधिक आहे. त्यामुळेच या सामन्यातही मुंबईचं वर्चस्व असेल असं मानलं जात आहे.
दोन्ही संघांसाठी टेन्शन वाढवणाऱ्या काही गोष्टी या सामन्यापूर्वी चर्चेत आहेत हे नक्की. मुंबईच्या संघाची गोलंदाजी ही सर्वसाधारण आहे. जसप्रीत बुमराह वगळळ्यास इतर गोलंदाजांना त्याची योग्य पद्धतीने साथ देता येत नसल्याचं दिसून आलं आहे. दुसरीकडे चेन्नईच्या संघासाठी सलामीवीरांचं अपयश ही चिंतेची बाब ठरत आहे. चेन्नईच्या संघाची फलंदाजी प्रामुख्याने मधल्या फळीतील शिवम दुबेवर फार जास्त प्रमाणात अवलंबून आहे.
नक्की वाचा >> ...म्हणून MI vs CSK सामन्याचा टॉसच ठरणार निर्णायक; मुंबईत आज रात्री 4,6 चा पाऊस?
दोन्ही संघांसाठी आजच्या सामन्यातील विजय पुढील वाटचाल सुखकर करणारा ठरणार आहे. त्यामुळेच अद्याप पॉइण्ट्स टेबलमधील चढाओढ सुरु झालेली नसताना आपलं स्थान अधिक भक्कम करण्यासाठी दोन्ही संघ संपूर्ण ताकदीने हा सामना खेळतील यात शंका नाही. दोन्ही संघांनी प्रत्येकी 5 वेळा आयपीएल चषकावर नाव कोरलं आहे.
मुंबई आणि चेन्नई हे दोन्ही संघ एकूण 38 वेळा आमने-सामने आले आहेत. त्यापैकी 21 वेळा मुंबईने विजय मिळवला असून चेन्नईने 17 वेळा सामने जिंकले आहेत. त्यामुळे या आकडेवारीमध्ये मुंबईचं पारडं जड दिसत आहे. मात्र असं असलं तरी सध्याची स्थिती पाहता हा सामना मुंबईसाठी म्हणावा तितका सोपा नक्कीच नसणार.
वानखेडेची खेळपट्टी ही फलंदाजांसाठी नंदनवन समजली जाते. या मैदानावरील बॉण्ड्री लाइन्स तुलनेनं लहान आहेत. तसेच खेळपट्टी अगदी सपाट असल्याने अधिक धावसंख्येचा सामना अपेक्षित आहे. सामान्यपणे नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजीला कर्णधार प्राधान्य देतात.
मुंबई इंडियन्स संभाव्य प्लेइंग इलेव्हन -
हार्दिक पांड्या (कर्णधार), रोहित शर्मा, इशान किशन, तिलक वर्मा, टीम डेव्हिड, सूर्यकुमार यादव, रोमॅरियो शेफर्ड, मोहम्मद नबी, गेराल्ड कोएत्झी, जसप्रीत बुमराह, आकाश मधवाल,
सबस्टीट्यूट - डेवाल्ड ब्रेविस, नमन धीर, नेहल वढेरा, हार्विक देसाई, श्रेयस गोपाल
चेन्नई सुपर किंग्ज संभाव्य प्लेइंग इलेव्हन -
ऋतुराज गायकवाड (कर्णधार), रवींद्र जडेजा, महेंद्रसिंग धोनी, अजिंक्य रहाणे, डॅरेल मिचेल, शिवम दुबे, रचिन रवींद्र, तुषार देशपांडे, शार्दुल ठाकूर, मथीशा पाथिराना, मुस्ताफिझूर रहमान,
सबस्टीट्यूट - मोईन अली, शेख रशीद, मिचेल सँटनर, निशांत सिंधू, दिपक चहर,
सायंकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी प्रत्यक्ष खेळाला सुरुवात होईल.
मुंबईच्या संघाचे होम ग्राऊण्ड असलेल्या वानखेडे स्टेडियमवर हा सामना रंगणार आहे.
या सामन्याचं लाईव्ह प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स 1, स्टार स्पोर्ट्स 1 हिंदी बरोबरच जीओ सिनेमा अॅपवर सामना लाईव्ह पाहता येईल.
ऋतुराज गायकवाड (कर्णधार), महेंद्रसिंग धोनी, मोईन अली, दिपक चहर, तुषार देशपांडे, शिवम दुबे, राजवर्धन हंगरगेकर, रवींद्र जडेजा, अजय मंडल, मुकेश चौधरी, अजिंक्य रहाणे, शेख रशीद, मिचेल सँटनर, सिमरजीत सिंग, निशांत सिंधू, प्रशांत सोळंकी, महेश तीक्षणा, रचिन रवींद्र, शार्दुल ठाकूर, डॅरेल मिचेल, समीर रिझवी, मुस्ताफिझूर रहमान, अवनीश राव अरावेली, शिवम दुबे, डेव्हॉन कॉनवे, मथीशा पाथिराना,
हार्दिक पांड्या (कर्णधार), रोहित शर्मा, डेवाल्ड ब्रेविस, सूर्यकुमार यादव, इशान किशन, तिलक वर्मा, टीम डेव्हिड, विष्णू विनोद, अर्जुन तेंडुलकर, शम्स मुलानी, नेहल वढेरा, जसप्रीत बुमराह, कुमार कार्तिकेय, पियुष चावला, आकाश मधवाल, ल्यूक वुड, रोमॅरियो शेफर्ड, गेराल्ड कोएत्झी, श्रेयस गोपाल, नुवान तुषारा, नमन धीर, अंशुल कंबोज, मोहम्मद नबी, शिवालिक शर्मा, जेसन बेहरेनडॉर्फ, दिलशान मदुशंका, सूर्यकुमार यादव.