Mahendra singh dhoni retirement : क्रिकेटमधील सर्वात श्रीमंत लीग म्हणून ज्या आयपीएलचा (IPL 2024) उल्लेख होतो, याच आयपीएलची क्रेझ आता कमी होण्याची शक्यता आहे. यंदाचा हंमाग हा महेंद्रसिंग धोनीच्या (MS Dhoni) करियरमधील अखेरचा हंगाम असेल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. अशातच चेन्नई सुपर किंग्जने (CSK) सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमुळे सध्या चर्चेला उधाण आलं आहे. चेन्नई सुपर किंग्ज राजस्थान रॉयल्सविरुद्ध अखेरचा होम ग्राऊंड सामना खेळत आहे. अशातच सामन्यापूर्वी चेन्नईने चाहत्यांना सामन्यानंतर मैदानावर थांबण्याची खास विनंती केली आहे. त्यामुळे आता धोनी अखेरचा (MS Dhoni IPL Retirement) सामना खेळतोय का? असा सवाल विचारला जात आहे.
Requesting the Superfans to Stay back after the game!
Something special coming your way! #CSKvRR #YellorukkumThanks pic.twitter.com/an16toRGvp
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) May 12, 2024
चेन्नई सुपर किंग्जच्या सोशल मीडिया हॅडलवरून एक पोस्टर शेअर करण्यात आलंय. त्या पोस्टरच्या माध्यमातून चेपॉकवरील 38 हजार प्रेक्षकांना सामन्यानंतर काही वेळ थांबण्याची विनंती करण्यात आलीये. 'सर्व चाहत्यांना सामन्यानंतर थांबण्याची विनंती करण्यात येत आहे. तुमच्यासाठी काही खास होणार आहे', असं चेन्नईच्या सोशल मीडियावर पोस्टवर लिहिण्यात आलंय. चेपॉकवर काय खास असणार? असा सवाल आता विचारला जात आहे. तर काही चाहत्यांना धोनीच्या निवृत्तीची धास्ती बसली आहे.
गेल्या वर्षी देखील धोनी अखेरची आयपीएल खेळणार, अशा चर्चांना उधाण आलं होतं. मात्र, डेफिनेटली नॉट म्हणत धोनी पुन्हा मैदानात आला अन् चेन्नईच्या चाहत्यांची इच्छा पूर्ण केली. त्यामुळे आता धोनी आयपीएल करियरला पूर्णविराम देणार का? असा सवाल विचारला जातोय.
महेंद्रसिंह धोनीने 2008 पासून चेन्नई सुपर किंग्ज संघाचा भाग आहे. धोनीने आतापर्यंत चेन्नईकडून 262 सामने खेळले आहेत. पहिल्या हंगामापासून धोनीने अखेरपर्यंत चेन्नईची साथ सोडली नाही. त्यानं सीएसकेकडून आतापर्यंत 5218 धावा केल्या आहेत. त्याची सरासरी 39 असून त्यात 24 अर्धशतकांचा समावेश आहे. धोनीला आयपीएलमध्ये एकदाही शतक झळकावता आलं नाही. मात्र, फिनिशरची भूमिका धोनीने अनेकदा बजावली आहे. विशेष म्हणजे त्याने सीएसकेला पाच आयपीएल टायटल जिंकून दिले आहेत. त्यामुळे धोनीकडे आयपीएलचा यशस्वी कर्णधार म्हणून पाहिलं जातं.