IPL 2024 Prize Money: चॅम्पियन KKR वर पैशांची बरसात; हैदराबादही झाली मालामाल, पाहा अवॉर्ड्स लिस्ट

IPL 2024 Prize Money: आयपीएल 2024 च्या फायनल सामन्यानंतर भव्य पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. ज्यामध्ये चॅम्पियन आणि उपविजेत्या टीमवर पैशांचा वर्षाव करण्यात आला.

सुरभि जगदीश | Updated: May 27, 2024, 07:07 AM IST
IPL 2024 Prize Money: चॅम्पियन KKR वर पैशांची बरसात; हैदराबादही झाली मालामाल, पाहा अवॉर्ड्स लिस्ट title=

IPL 2024 Prize Money: कोलकाता नाईट रायडर्सने यंदाच्या वर्षीची आयपीएल जिंकली. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली कोलकाताने तिसऱ्यांदा आयपीएलच्या ट्रॉफीवर नाव कोरलं आहे. एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या फायनल सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सने (KKR) सनरायझर्स हैदराबादचा (SRH) आठ विकेट्स राखून पराभव केला. या सामन्यात कोलकाता टीमला विजयासाठी 114 रन्सचं लक्ष्य मिळालं होतं. जे टीमने अवघ्या 11व्या ओव्हर्समध्ये पूर्ण केलं. 

आयपीएल 2024 च्या फायनल सामन्यानंतर भव्य पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. ज्यामध्ये चॅम्पियन आणि उपविजेत्या टीमवर पैशांचा वर्षाव करण्यात आला. याशिवाय स्पर्धेत चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना अवॉर्ड देण्यात आले. विजेत्या कोलकाता नाईट रायडर्सला 20 कोटी रुपये, तर उपविजेत्या सनरायझर्स हैदराबादला 12.50 कोटी रुपये देण्यात आले आहेत.

टॉप 4 टीम्सना किती मिळाली प्राईज मनी

  • विजेती टीम (कोलकाता नाईट रायडर्स) - 20 कोटी रुपये
  • उपविजेती - (सनराईजर्स हैदराबाद) - 12.5 कोटी रूपये
  • तिसरी टीम (राजस्थान रॉयल्स) – 7 कोटी रुपये
  • चौथी टीम (रॉयल चॅलेंजर्स बंगलोर) – 6.5 कोटी रुपये

या खेळाडूंना मिळाले खास अवॉर्ड्स

  • सिझनमधील सर्वाधिक विकेट्स (पर्पल कॅप) – हर्षल पटेल 25 विकेट्स (रु. 10 लाख)
  • सिझनमधील सर्वाधिक रन्स (ऑरेंज कॅप) – विराट कोहली 741 रन्स (रु. 10 लाख)
  • इमर्जिंग प्लेयर ऑफ द सीजन – नितीश कुमार रेड्डी (रु. 10 लाख)
  • मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर ऑफ द सीझन - सुनील नरेन (रु. 10 लाख)
  • इलेक्ट्रिक स्ट्रायकर ऑफ द सीझन- जेक फ्रेझर-मॅकगर्क (रु. 10 लाख)
  • फॅन्टसी प्लेअर ऑफ द सीझन- सुनील नरेन (रु. 10 लाख)
  • सुपर सिक्स- अभिषेक शर्मा (रु. 10 लाख)
  • कॅच ऑफ द सिझन- रमणदीप सिंग (10 लाख)
  • फेअरप्ले अवॉर्ड्स – सनरायझर्स हैदराबाद

आयपीएल 2024 मध्ये सर्वाधिक रन्स करणारे खेळाडू 

  • विराट कोहली (रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू)- 741 रन्स
  • ऋतुराज गायकवाड (चेन्नई सुपर किंग्स)- 583 रन्स
  • रियान पराग (राजस्थान रॉयल्स)- 573 रन्स
  • ट्रेविस हेड (सनराइ़जर्स हैदराबाद)- 567 रन्स
  • संजू सॅमसन (राजस्थान रॉयल्स)- 531 रन्स

आईपीएल 2024 में सबसे ज्यादा विकेट

  • हर्षल पटेल (पंजाब किंग्स)- 24 विकेट
  • वरुण चक्रवर्ती (कोलकाता नाइट रायडर्स)-  21 विकेट
  • जसप्रीत बुमराह (मुंबई इंडियन्स)- 20 विकेट
  • आंद्रे रसेल (कोलकाता नाइट रायडर्स)- 19 विकेट
  • हर्षित राणा (कोलकाता नाइट रायडर्स)- 19 विकेट