IPL Auction : आयपीएल लिलावात ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंवर पैशांचा पाऊस

आयपीएलच्या २०२० सालच्या मोसमासाठीचा लिलाव कोलकात्यामध्ये पार पडला.

Updated: Dec 19, 2019, 10:32 PM IST
IPL Auction : आयपीएल लिलावात ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंवर पैशांचा पाऊस title=

कोलकाता : आयपीएलच्या २०२० सालच्या मोसमासाठीचा लिलाव कोलकात्यामध्ये पार पडला. या लिलावात अनेक खेळाडू करोडपती झाले, तर काही खेळाडूंच्या पदरी निराशा आली. आयपीएलच्या या लिलावात ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंवर पैशांचा पाऊस पडला. आयपीएलच्या लिलावाची सुरुवातच ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूपासून झाली. क्रिस लिनला मुंबईने २ कोटी रुपयांना विकत घेतलं.

आयपीएलच्या यंदाच्या लिलावातला सगळ्यात महागडा खेळाडूही ऑस्ट्रेलियाचाच ठरला. पॅट कमिन्सला कोलकात्याने १५.५० कोटी रुपयांना विकत घेतलं. पॅट कमिन्स हा आयपीएल इतिहासातला दुसरा सगळ्यात महाग खेळाडू आणि सगळ्यात महाग परदेशी खेळाडू ठरला. युवराज सिंग हा आयपीएल इतिहासातला सगळ्यात महागडा खेळाडू आहे. २०१५ साली दिल्लीने युवराजला १६ कोटी रुपयांना विकत घेतलं होतं.

ऑस्ट्रेलियाच्या सगळ्या खेळाडूंना मिळून ५७ कोटी २५ लाख रुपये मिळाले आहेत. यंदाच्या मोसमात ऑस्ट्रेलियाच्या एकूण १२ खेळाडूंचा लिलाव झाला.

ऑस्ट्रेलियाचे खेळाडू 

क्रिस लिन- २ कोटी रुपये- मुंबई

एरॉन फिंच- ४.४० कोटी रुपये- बंगळुरू

ग्लेन मॅक्सवेल- १०.७५ कोटी रुपये- पंजाब

पॅट कमिन्स- १५.५० कोटी रुपये- कोलकाता

एलेक्स कॅरी- २.४० कोटी रुपये- दिल्ली

नॅथन कुल्टर नाईल- ८ कोटी रुपये- मुंबई

मिचेल मार्श- २ कोटी रुपये- हैदराबाद

जॉस हेजलवूड- २ कोटी रुपये- चेन्नई

क्रीस ग्रीन- २० लाख रुपये- कोलकाता

जॉस फिलीप- २० लाख रुपये- बंगळुरू

केन रिचर्डसन- ४ कोटी रुपये- बंगळुरू

मार्कस स्टॉयनिस- ४.८० कोटी रुपये- दिल्ली

एन्ड्रयू टाय- १ कोटी रुपये- राजस्थान

आयपीएलचा लिलाव : हे खेळाडू झाले मालामाल