IPL 2021 : जेव्हा झहीर खानने आयपीएलच्या लिलावामध्ये नाव घेतले, तेव्हा या खेळाडूच्या डोळ्यात अश्रू आले

गोलंदाजी कोच झहीर खानने यावर्षी 18 फेब्रुवारीला आयपीएलच्या लिलावादरम्यान त्याचे नाव घेतले होते. तेव्हा तो खूप इमोशनल झाला.

Updated: Apr 17, 2021, 08:00 PM IST
IPL 2021 : जेव्हा झहीर खानने आयपीएलच्या लिलावामध्ये नाव घेतले, तेव्हा या खेळाडूच्या डोळ्यात अश्रू आले

मुंबई: आयपीएलचा गतविजेता चॅम्पियन मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज युद्धवीर सिंह चारक (Yudhvir Singh Charak) म्हणाला की, त्याचा गोलंदाजी कोच झहीर खानने यावर्षी 18 फेब्रुवारीला आयपीएलच्या लिलावादरम्यान त्याचे नाव घेतले होते. तेव्हा तो खूप इमोशनल झाला.

मुंबई इंडियन्सने ट्विटरवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यात चरक म्हणाला की, "मला माहित होते की जर माझे नाव घेतले गेले तर ते सगळ्यात शेवटी घेतले जाईल. मी असा विचार केला की, माझं नाव घेतलं तरं बकं होईल. मी आणि माझे कुटुंब टीव्ही पहात होतो. लिलावाच्या वेळी जेव्हा जॅक सर (झहीर खान) ने माझे नाव घेतले तेव्हा माझ्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले.

मी जम्मू-काश्मीरचे नाव उज्वल करीन

चारक म्हणाला, "माझ्यासाठी ते किती अविश्वसनीय होते हे मी सांगू शकत नाही. मुंबईसाठी निवड होणे ही माझ्यासाठी आणि माझ्या जम्मू-काश्मीरसाठी (जम्मू-काश्मीर) एक मोठी गोष्ट आहे. माझ्या राज्यातील क्रिकेटमधील माझ्या सहकाऱ्यांना माझ्याकडून खूप अपेक्षा आहेत. मी सामना खेळून माझ्या राज्याचे नाव उंच करणार आहे.

सैयद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये (Syed Mushtaq Ali Trophy) हैदराबादच्या टीम मधून (Hyderabad) खेळलेल्या युद्धवीर सिंह चारक (Yudhvir Singh Charak) ला मुंबई इंडियंसच्या टीममध्ये आईपीएल लिलावामध्ये (IPL Auction 2021) 20 लाखात खरेदी केले आहे.