आयपीएल संपली! पहा कोणाला मिळाला कोणता अवॉर्ड...

ऋतुराजने 635 धावा केल्या आणि ऑरेंज कॅप जिंकली. त्याचबरोबर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरच्या हर्षल पटेलने सर्वाधिक विकेट्स घेत पर्पल कॅप काबिज केली आहे. 

Updated: Oct 16, 2021, 01:05 PM IST
आयपीएल संपली! पहा कोणाला मिळाला कोणता अवॉर्ड...

दुबई : शुक्रवारी दुबईमध्ये यंदाच्या आयपीएलचा समारोप झाला. चेन्नई सुपर किंग्जने अंतिम सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा 27 धावांनी पराभव करत चौथ्यांदा जेतेपद पटकावलं. गेल्या वर्षी महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली सर्वात पिछाडीवर पडलेल्या चेन्नई सुपर किंग्सने पुन्हा एकदा स्वत:ला सिद्ध केलं. दरम्यान अंतिम फेरीनंतर 8 टीम्समधील खेळाडूंना विविध अवॉर्ड्स आणि बक्षीस रक्कम देऊन सन्मानित करण्यात आलं.

चेन्नई सुपर किंग्जचा युवा ओपनर ऋतुराज गायकवाड आयपीएल 2021मध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरलाय. ऋतुराजने 635 धावा केल्या आणि ऑरेंज कॅप जिंकली. त्याचबरोबर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरच्या हर्षल पटेलने सर्वाधिक विकेट्स घेत पर्पल कॅप काबिज केली आहे. तर आता इतर पुरस्कार कोणत्या खेळाडूंना मिळाले ते पाहूयात-

संपूर्ण सीझनमधील अवॉर्ड्स

 • ऑरेंज कॅप - ऋतुराज गायकवाड, CSK (10 लाख रुपये)
 • पर्पल कॅप - हर्षल पटेल, RCB (10 लाख रुपये)
 • इमर्जिंग प्लेयर ऑफ द इयर - ऋतुराज गायकवाड, CSK (10 लाख रुपये)
 • फेयरप्ले अवॉर्ड - राजस्थान रॉयल्स (10 लाख रुपये)
 • परफेक्ट कॅच ऑफ द सीजन - रवि बिश्नोई, PBKS (10 लाख रुपये)
 • सुपर स्ट्राइकर ऑफ द सीजन - शिमरोन हेटमायर, DC (10 लाख रुपये)
 • गेमचेंजर ऑफ द सीजन - हर्षल पटेल, RCB (10 लाख रुपये)
 • क्रॅक इट सिक्स ऑफ द सीजन - केएल राहुल (10 लाख रुपये)
 • पावरप्लेयर ऑफ द सीजन - वेंकटेश अय्यर (10 लाख रुपये)
 • मोस्ट वॅल्युएबल प्लेयर ऑफ द सीजन - हर्षल पटेल (10 लाख रुपये)
 • रनर अप टीम - कोलकाता नाइट राइडर्स (12.5 करोड़ रुपये)
 • विजेती टीम - चेन्नई सुपर किंग्स (20 करोड रुपये)