IPL 2022 : RCB चा नव्या कर्णधाराचा शोध झाला पूर्ण, धोनीचा हा खेळाडू करणार नेतृत्व

विराट कोहलीने कर्णधारपद सोडल्यानंतर आरसीबीला नव्या कर्णधाराचा शोध होता. आता हा शोध पूर्ण झाला आहे. 

Updated: Feb 14, 2022, 04:48 PM IST
IPL 2022 : RCB चा नव्या कर्णधाराचा शोध झाला पूर्ण, धोनीचा हा खेळाडू करणार नेतृत्व title=

IPL 2022 : आयपीएलचा मेगा लिलाव 2022 धमाकेदार ठरला. स्पर्धेतील सर्व 10 संघांनी जगभरातील खेळाडूंवर करोडो रुपये खर्च केलेत. अनेक संघांनी आपल्या जुन्या खेळाडूंना विकत घेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. अनेक संघांनी लिलावाद्वारे त्यांच्या संघासाठी कर्णधार शोधले. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) ला देखील लिलावात स्वतःसाठी एका कर्णधाराची गरज होती कारण विराट कोहलीने या संघाची कमान सोडली आहे. आरसीबीला लिलावातून कर्णधार मिळाला आहे.

RCB ला यंदा लिलावातूनच स्वत:साठी कर्णधार शोधावा लागणार होता. त्यामुळे आरसीबीला कर्णधार मिळाला असल्याचे मानले जात आहे. फाफ डू प्लेसिस असे या खेळाडूचे नाव आहे. डू प्लेसिसला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 7 कोटी रुपयांना विकत घेतले. गेल्या आयपीएल हंगामापर्यंत चेन्नई सुपर किंग्जकडून खेळलेला डू प्लेसिस आता नव्या जर्सी आणि संघासोबत दिसणार आहे. आरसीबी डु प्लेसिसला त्यांचा नवा कर्णधार बनवू शकते. या खेळाडूने वर्षानुवर्षे दक्षिण आफ्रिकेच्या संघाचे नेतृत्व केले आहे.

सीएसकेला चॅम्पियन बनवले

उत्कृष्ट फलंदाज, क्षेत्ररक्षक म्हणून खेळणारा फाफ डू प्लेसिस कर्णधारही होऊ शकतो. CSK शी दीर्घकाळ संबंध असलेला फाफ आता RCB चा भाग होणार असून विराट कोहलीसोबत खेळताना दिसणार आहे. फाफ डू प्लेसिसने IPL 2021 मध्ये शानदार फलंदाजी करताना 600 हून अधिक धावा केल्या. त्याने अनेक प्रसंगी चेन्नईला जिंकून दिले आहे आणि गरज असेल तेव्हा संघाला आपले सर्वोत्तम दिले आहे. त्यामुळेच आरसीबीने फाफ डू प्लेसिसवर विश्वास व्यक्त केला.

100 हून अधिक सामने

फाफ डू प्लेसिसच्या आयपीएल कारकिर्दीबद्दल सांगायचे तर, त्याच्याकडे 100 आयपीएल सामने खेळण्याचा अनुभव आहे. यामध्ये त्याने 34.94 च्या सरासरीने 2935 धावा केल्या आहेत. याशिवाय त्याने आयपीएलमध्ये 22 अर्धशतके झळकावली आहेत आणि त्याची आयपीएलमधील सर्वोत्तम धावसंख्या 96 आहे. गेल्या वेळी चेन्नईने फाफ डू प्लेसिसला तीन कोटी रुपयांमध्ये आपल्या संघाचा भाग बनवले होते. अशा स्थितीत यंदा फाफला दुप्पट भाव मिळाला आहे. त्याची मूळ किंमत 2 कोटी रुपये होती.

IPL 2022 च्या मेगा लिलावापूर्वी, 4 वेळा चॅम्पियन CSK ने एमएस धोनी, रवींद्र जडेजा, ऋतुराज गायकवाड आणि मोईन अली यांना कायम ठेवले आहे. या संघाला चॅम्पियन बनवण्यात इतरही अनेक खेळाडूंचा मोठा वाटा आहे, पण कायम ठेवण्याच्या नियमांचा विचार करता CSK सर्वांनाच कायम ठेवू शकले नाही.