मुंबई : आयपीएलमध्ये सर्वात महागडा खेळाडू म्हणून ईशान किशनकडे पाहिलं जातं. मात्र त्याची कामगिरी फ्लॉप राहिली आहेत. एकाही सामन्यात त्याची बॅट चालली नाही. सर्वात महागडा खेळाडू तो टीमसाठी खऱ्या अर्थानं झाला. आयपीएलमध्ये सर्वात जास्त पैसे त्याच्यावर मोजले पण त्याची कामगिरीही सुपरफ्लॉप ठरली.
लखनऊ विरुद्धच्या सामन्यात ईशान किशन अजब पद्धतीनं आऊट झाला. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आठव्या ओव्हरमध्ये रवि बिश्नोई बॉलिंग करत होता. ईशान किशन फलंदाजी करत असताना बॉल कीपरच्या पायावर लागून पुढे गेला आणि खेळाडूनं तो कॅच पकडला.
ईशान किशन आऊट की नॉटआऊट असा प्रश्न निर्माण झाला. त्यावेळी रिव्ह्यू घेण्यात आला. या रिव्ह्यूमध्ये तो आऊट असल्याचं सांगण्यात आलं. ईशानच्या बॅटला लागून बॉल कीपरच्या पायावर गेला. शूजवर बॉल आदळून तो पुढे जाताच जवळच उभ्या असलेल्या दुसऱ्या खेळाडूनं तो कॅच पकडला आणि ईशानला कॅच आऊट केलं.
ईशानला मुंबईने 15.25 कोटी रुपये देऊन टीममध्ये घेतलं. एवढे पैसे खर्च करूनही ईशान 8 पैकी एकाही सामन्यात तेवढ्या तोडीचं खेळला नाही. त्यामुळे मुंबईचे पैसे पाण्यात गेल्यात जमा आहेत. ईशान किशनला सोशल मीडियावर त्याच्या खराब कामगिरीसाठी नेटकऱ्यांनी ट्रोल केलं.
Ishan Kishan LSG vs MI Wicket Videohttps://t.co/eBH2akYUdJ
— MohiCric (@MohitKu38157375) April 24, 2022