प्रेमात क्रिकेटरची पडली विकेट, Ishan Kishan ची गर्लफ्रेंड लाखात एक

आता इशान पुन्हा एकदा चर्चेत आलंय ते त्याच्या गर्लफ्रेंडमुळे, इशांत किशन एका मुलीला डेट करत आहे 

Updated: Feb 25, 2022, 09:54 PM IST
प्रेमात क्रिकेटरची पडली विकेट, Ishan Kishan ची गर्लफ्रेंड लाखात एक title=

मुंबई : सुपरस्टार विकेटकिपर आणि फलंदाज इशान किशनने गेल्या काही वर्षांत आपल्या खेळाने क्रिकेट जगात एक वेगळंच स्थान निर्माण केले आहे. त्याच्या या खेळामुळेच तो, आयपीएलमधील सर्वात महागडा खेळाडू देखील ठरला आहे. इशांत किशनला मुंबई इंडियन्सने 15.25 कोटी रुपयात विकत घेतली. ज्यामुळे सर्वत्र एकच चर्चा सुरु झाली. इशांतला इतकी जास्त अमाउंट देऊन खरेदी केल्यानंतर सोशल मीडियापासून सगळ्यांच्या तोंडावर इशानचं नाव येऊ लागलं.

परंतु आता इशान पुन्हा एकदा चर्चेत आलंय ते त्याच्या गर्लफ्रेंडमुळे, इशांत किशन एका मुलीला डेट करत आहे आणि या दोघांचे एकत्र फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यामुळे इशांतच्या आयुष्यात आलेली ही मुलगी कोण आणि ती काय करते याबाबत अनेकांच्या मनात प्रश्न उपस्थित झाले आहेत.

इशान किशनच्या गर्लफ्रेंडचं नाव अदिती हुंडिया आहे आणि ती एक मॉडेल आहे. तसेच ती सोशल मीडियावर चांगलीच लोकप्रिय आहे. आज आम्ही तुम्हाला तिच्याबद्दल सांगणार आहोत.

अदिती हुंडिया सध्या फॅशन जगत आणि ग्लॅमरचा प्रसिद्ध चेहरा आहे. अदितीने नुकतेच पोलंड येथे झालेल्या मिस सुपरनॅशनल स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले.

अदिती एक मॉडेल आहे आणि त्यामुळेच ती तिच्या स्टायलिश लूकमुळे चर्चेत असते. ती चाहत्यांसोबत सतत माहिती शेअर करत असते. तिचे फोटो देखील चाहत्यांना खूप आवडतात.

अदिती हुंडिया 2016 मध्ये एलिट मिस राजस्थानमध्ये उपविजेती ठरली आहे. तिला मॉडेलिंगच्या जगात करिअर करायचे आहे.

अदिती हुंडिया 2017 मध्ये फेमिना मिस इंडिया फायनलिस्ट राहिली आहे आणि तिने 2018 मध्ये मिस सुपरनॅशनल इंडिया अवॉर्ड जिंकला आहे. 

इशान आणि आदिती बऱ्याच वेळा एकत्र पाहिले गेले आहे. त्याचे एकत्र फोटो देखील समोर आले आहेत, मात्र आतापर्यंत इशान किंवा आदितीपैकी कोणीही आपल्या नात्याबद्दल उघडपणे काहीही सांगितं नाहिय. त्यामुळे दोघांच्याही चाहत्यांचे लक्ष या दोघांच्या घोषणेकडे आहे आणि लवकच ते याची घोषणा करतील अशी चाहत्यांना अपेक्षा आहे.