Ishan Kishan Century: ईशान किशनची बॅट तळपतीच, Ranji Trophy त ठोकलं दमदार शतक

Ishan Kishan Century: बांगलादेश (India vs Bangladesh) विरूद्धच्या कसोटी मालिकेचा ईशान किशन (Ishan Kishan) भाग नाही आहे. त्यामुळे तो भारतात परतला आहे. मात्र भारतात परतूनही तो थांबला नाही आहे,त्याने रणजी ट्रॉफीमध्ये (Ranji Trophy)  सहभाग घेतला आहे. या रणजी ट्रॉफीमध्ये देखील त्याचा फॉर्म कायम आहे. 

Updated: Dec 15, 2022, 09:59 PM IST
Ishan Kishan Century: ईशान किशनची बॅट तळपतीच, Ranji Trophy त ठोकलं दमदार शतक title=

Ishan Kishan Century: टीम इंडियाचा युवा फलंदाज ईशान किशन (Ishan Kishan) चांगलाच फॉर्ममध्ये आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये डबल सेंच्यूरी ठोकल्यानंतर आता त्याने रणजी ट्रॉफीत धुवाधार शतक ठोकले आहे. रणजी ट्रॉफीत शतक ठोकून त्याने टेस्टमध्ये खेळण्याचीही दावेदारी पेश केली आहे. त्यामुळे आता टीम इंडिय़ाच्या (Team India) टेस्ट संघात त्याला स्थान मिळत का? हे पाहावे लागणार आहे.   

बांगलादेश (India vs Bangladesh) विरूद्धच्या कसोटी मालिकेचा ईशान किशन (Ishan Kishan) भाग नाही आहे. त्यामुळे तो भारतात परतला आहे. मात्र भारतात परतूनही तो थांबला नाही आहे,त्याने रणजी ट्रॉफीमध्ये (Ranji Trophy)  सहभाग घेतला आहे. या रणजी ट्रॉफीमध्ये देखील त्याचा फॉर्म कायम आहे. 

ईशानची शतकी खेळी 

रणजी ट्रॉफी (Ranji Trophy) हंगामातील पहिल्या सामन्यात ईशानचा (Ishan Kishan) संघ केरळशी सामना करत आहे.या सामन्यात सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या ईशान किशनने (Ishan Kishan) 132 धावांची खेळी केली. त्याने 195 चेंडूंच्या खेळीत 9 चौकार आणि 8 षटकार मारले. या डावात झारखंडच्या इतर कोणत्याही फलंदाजाला एकही षटकार मारता आला नाही.

केरळ संघाच्या 475 धावा

केरळने पहिल्या डावात 475 धावा केल्या होत्या. झारखंडने 114 धावांत 4 विकेट गमावल्या. यानंतर ईशान किशनने (Ishan Kishan) सौरभ तिवारीसोबत 202 धावांची भागीदारी रचली. या खेळीत सौरभचे शतक हुकले आणि 97 धावांची इनिंग खेळून तो बाद झाला. झारखंड संघ 349 धावांवर आटोपला. दुसऱ्या डावात केरळने एका विकेटवर 60 धावा केल्या आहे. त्यामुळे संघाची आघाडी 195 धावांची होती.

टेस्टचा दावेदार 

ईशान किशन (Ishan Kishan)  अशीच बॅटींग करत राहिला तर त्याला टीम इंडियाच्या टेस्ट संघातही स्थान मिळू शकते. दरम्यान या सामन्यापूर्वी खेळल्या गेलेल्या 46 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये इशानने 38.42 च्या सरासरीने 2805 धावा केल्या आहेत.त्याने 5 शतके आणि 16 अर्धशतके ठोकली आहेत. त्याची सर्वात मोठी खेळी 273 धावांची आहे.

दरम्यान बांगलादेश विरूद्द डबल सेंच्यूरी ठोकल्यानंतर ईशान (Ishan Kishan) चांगलाच चर्चेत आला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा रणजी ट्रॉफीत (Ranji Trophy) शतक ठोकून लंब रेस का खिलाडी असल्याचे दाखवून दिले आहे.