Job News : BCCI मध्ये नोकरीची संधी; पद- पगार लाखात एक, पाहा कसा कराल अर्ज?

Job News : क्रिकेटवर जीवापाड प्रेम आहे? याच क्षेत्रात तुम्हाला नोकरी करण्याची संधी मिळाली तर? बीसीसीआय ही सुवर्णसंधी देतंय. पद आणि सुविधा सगळं एकदम बेस्ट. 

सायली पाटील | Updated: Jun 23, 2023, 02:36 PM IST
Job News : BCCI मध्ये नोकरीची संधी; पद- पगार लाखात एक, पाहा कसा कराल अर्ज?  title=
Job news bcci invites job application for Mens Selection Committee post

Job News : तुम्हीही नोकरीच्या शोधात आहात का? तुमचं उत्तर हो असेल तर एक सुवर्णसंधी तुमच्यापर्यंत चालत आली आहे. चांगला पगार, चांगलं पद, नवा अनुभव आणि तितक्याच प्रभावी ओळखी करण्याची संधी तुम्हाला या नोकरीच्या निमित्तानं मिळणार आहे. मुळात साचेबद्ध नोकरीपेक्षा (recruitment) ही संधी तुमच्यासाठी पूर्णपणे नवी ठरू शकते. तेव्हा तुम्हीही जर अशाच एखाद्या नोकरीच्या शोधात असाल तर, ही माहिती नक्की वाचा. 

BCCI मध्ये नोकरीची सुवर्णसंधी 

BCCI अर्थात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या वतीनं सोशल मीडियाच्या माध्यमातून या नोकरीसाठीचे अर्ज मागवण्यात आले आहेत. पुरुष संघाच्या निवड समितीच्या सदस्यपदासाठीची ही नोकरी असून, बीसीसीआयच्या संकेतस्थळावर त्यासाची पात्रता आणि इतर निकषांची माहिती देण्यात आली आहे. या पदासाठीची सविस्तर माहिती आणि आवश्यट अटी खालीलप्रमाणं...
 
पद- पुरुष निवड समिती सदस्य/ 1 जागा  (Member of Men’s Selection Committee)

कामाचं स्वरुप - कसोटी, आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने, टी20 आणि इतर प्रकारच्या खेळांसाठी Senior संघाची निवड करणं. 

हेसुद्धा वाचा : 'कॅप्टन कूल' नव्हे, आता 'कोच Cool'; माही होणार संघाचा कर्णधार? 

- बीसीसीआयच्या नियमांचं पालन करणं 
- प्रत्येक प्रकारातील सामन्यांसाठी संघाच्या कर्णधाराची निवड करणं. 
- बीसीसीआयच्या सांगण्यावरून संघाच्या निवड प्रक्रियेशी संबंधित माहिती माध्यमांना देणं, पत्रकार परिषदांना संबोधित करणं. 
- आंतरदेशीय आणि आंतरराष्ट्रीय सामने पाहण्यासाठी प्रवास करणं. 
- दर तीन महिन्यांनी बीसीसीआयच्या वरिष्ठांना संघाच्या, खेळाडूंच्या कामगिरीचा अहवाल देणं. 
- आवश्यकतेनुसार बैठकांना उपस्थित राहणं. 
- नि:ष्पक्षपातीपणे आणि पारदर्शीपणे  संघातील खेळाडूंची निवड करणं 

शैक्षणिक पात्रत आणि अनुभव 

- वरील पदासाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीनं खालील क्रिकेट प्रकारांमध्ये खेळलेलं असावं
* 7 कसोटी सामने
* 30 प्रथम श्रेणी सामने किंवा 
* 10 आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने आणि 20 प्रथम श्रेणी क्रिकेट सामने 

- सदरील व्यक्तीनं खेळातून किमान 5 वर्षांपूर्वीच निवृत्ती घेतलेली असावी. 

अर्जदारांनी या पदासाठी 30 जून 2023 पर्यंत सायंकाळी 6 वाजेपर्यंत अर्ज करणं अपेक्षित आहे. यासाठी https://forms.gle/r4d4V9i7UHqGdfbTA या संकेकस्थळाला भेट द्या. अर्ज दाखल केल्यानंतर निवड झालेल्या अर्जदारांना प्रकट मुलाखतींसाठी बोलवण्यात येईल जिथून पुढे या नोकरीसाठीची प्रक्रिया पार पडेल.