कोहलीसोबतच्या त्या वादानंतर जॉनी बेअरस्टोची पलटी, पाहा काय म्हणाला

विराट कोहलीसोबत कोणत्या गोष्टीवरून मैदानात वाद झाला? जॉनी बेअरस्टोकडून खुलासा 

Updated: Jul 4, 2022, 01:26 PM IST
कोहलीसोबतच्या त्या वादानंतर जॉनी बेअरस्टोची पलटी, पाहा काय म्हणाला title=

मुंबई: इंग्लंड विरुद्ध पाचवा कसोटी सामना सुरू आहे. इंग्लंडच्या बॅटिंगदरम्यान विराट कोहलीचं रौद्र रुप पाहायला मिळालं. कोहली थेट फलंदाज जॉनी बेअरस्टोकशी भांडला. त्यांच्या मैदानातील वादाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. 

कोहली आणि जॉनी यांच्यातील वाद सोडवण्यासाठी दोन अंपायर्सना मध्यस्ती करावी लागली. त्यानंतर हा वाद शांत झाला. मोहम्मद शमीच्या ओव्हरदरम्यान हा वाद झाल्याची माहिती मिळाली आहे. या वादानंतर जॉनीने त्या व्हिडीओवर मोठा खुलासा केला आहे. 

कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी शमीच्या ओव्हरमध्ये दोघांमध्ये बाचाबाची झाली. त्यावेळी मला काय करायचं ते तू सांगू नको तू तोंड बंद करून बॅटिंग कर असं कोहली म्हणाल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. 

या वादावर जॉनीने मजेशीर उत्तर दिलं आहे. जॉनी म्हणाला की त्याने मला डिनरला बोलवायला नकार दिला. आमच्यामध्ये काही मोठा वाद नाही. आम्ही जवळपास 10 वर्ष एकमेकांविरुद्ध खेळत आहोत. त्यामुळे मला खात्री आहे की आपण एकत्र डिनर करताना दिसणार आहोत. याबाबत काळजी करण्याची गरज नाही.