Jos Buttler Champagne Celebration: इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्या खेळलेल्या गेलेल्या वर्ल्ड कप फायनलमध्ये (T20 World Cup 2022 Final) इंग्लंडने पाकिस्तानला 5 गडी पराभूत केलं. फायनल जिंकताच इंग्लंडने (England cricket team) दुसऱ्यांदा वर्ल्ड कपवर नाव कोरलंय. वर्ल्ड कप जिंकल्यानंतर टीमसोबत कॅप्टन जॉस बटलरने (Jos Buttler lifted the World Cup trophy) वर्ल्ड कप उचलला. त्यानंतर संघाने जंगी सेलिब्रेशन देखील केलं. त्यावेळी बटलरने केलेल्या एका कृत्यामुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. (jos buttler stopped champagne celebration for adil rasheed moeen ali after winning t20 world cup 2022)
इंग्लंडचा कॅप्टन जॉस बटलरने (Jos Buttler lifted the World Cup trophy) दिमाखात वर्ल्ड कप उचलला आणि एकच जल्लोष सुरू झाला. खेळाडू शॅम्पेन सेलिब्रेशनसाठी सज्ज झाले. यानंतर बटलरने सहकारी खेळाडू शॅम्पेनची बाटली (Champagne Celebration) उघडणार असल्याचं पाहिल्यानंतर त्यानं सेलिब्रेशन थांबवलं. बटलरने ताबडतोब त्याच्या शेजारी बसलेल्या आदिल रशीद (Adil Rashid) आणि मोईन अलीला (Moeen Ali) ट्रॉफी स्टेजवरून खाली पाठवलं. यानंतर खेळाडूंनी शॅम्पेन उघडून जंगी विजय साजरा झाला.
Respect for religious diversity is an essential element of any peaceful society.
Here England captain Jos Buttler asked Adil Rashid and Moeen Ali to leave before they celebrated with champagne. Respect.#ENGvsPAK #T20WorldCup22 #T20WorldCupFinal pic.twitter.com/Tu9pvqKZba
— Mohd Shahnawaz Hussain (@Mohd_S_Hussain) November 13, 2022
बटलरने आदिल रशीद आणि मोईन अलीला ट्रॉफी स्टेजवरून खाली पाठवल्यानं अनेकांच्या मनात प्रश्नात निर्माण झाला आहे. बटलरने असं का केलं? याचं उत्तर दडलंय धार्मिक पद्धतींमध्ये (Religious practices)... आदिल रशीद आणि मोईन अली हे मुस्लिम असून धार्मिक कारणांमुळे ते दारूपासून दूर राहतात. त्यामुळे बटलरने आनंदाच्या भरात देखील जाणीव राखली आणि सर्वांचं मन राखलं.
This might be a small gesture but this is what makes Pat Cummins great. He realised Khawaja had to dip because of the booze and rectifies it. pic.twitter.com/GNVsPGJhfK
— Fux League (@buttsey888) January 16, 2022
कमिन्सच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने (Australia) अॅशेस मालिका 4-0 ने जिंकली होती. हा विजय ऑस्ट्रेलियन संघाने जल्लोषात साजरा केला. गड्यांनी शॅम्पेन खोललं त्यामुळे टीमचा खेळाडू उस्मान ख्वाजाला (Usman Khawaja) सेलिब्रेशन सोडून स्टेज आणि त्याच्या टीमपासून दूर उभं राहावं लागलं. ख्वाजा लांब गेल्याचं पाहून ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी शॅम्पेन बॉटल न उघडण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी ऑस्ट्रलिया संघाचं कौतूक देखील होत होतं.