मुंबई : टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली कित्येक वर्षापासून फॉर्ममध्ये नाही.त्यामुळे अनेकवेळा त्याच्या फॉर्मवरून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते. आता पुन्हा एकदा त्याच्या फॉर्मवरून प्रश्न उपस्थित केला गेलाय. यावेळी तर त्याला टी20 संघातून बाहेर बसवावे लागले असे विधान 1983 विश्वचषकाचा कर्णधार कपिल देव याने केले आहे.
कपिल देव एका न्यूज चॅनलशी बोलताना त्यांनी विराट कोहलीचा परफॉर्मन्सवर आणि त्याच्या संघातील स्थानावर भाष्य केले आहे. कपिल देवने माजी कर्णधार विराट कोहलीला भारताच्या T20 संघातून वगळण्याचे विधान केले आहे.
कपिल देव म्हणाला की, खरं तर अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की, विराट कोहलीला टीम इंडियाच्या T20 सामन्याच्या प्लेइंग-11 मधून बाहेर काढून बेंचवर बसण्यास भाग पाडले जाऊ शकते. याचा संदर्भ देताना कपिल देवने स्टार स्पिनर रविचंद्रन अश्विनचे उदाहरणही दिले.
कपिल देव म्हणाला की, 'होय, आता अशी परिस्थिती झाली आहे की, तुम्हाला विराट कोहलीला टी-20 सामन्यांच्या प्लेइंग-11 मधून वगळावे लागेल. जर तुम्ही जागतिक क्रमवारीतल्या दुसऱ्या क्रमांकाच्या गोलंदाज रविचंद्रन अश्विनला कसोटीत बाहेर बसवू शकता, तर जागतिक क्रमवारीतल्या क्रमांक एकच्या खेळाडूला (विराट कोहली) ही बाहेर बसवू शकता असे विधान त्यांनी केली आहे.
युवा खेळाडूंना बाहेर बसवू शकत नाही
कपिल देव पुढे म्हणाला की, 'मला तर इतकचं वाटत की, विराट कोहलीने धावा कराव्यात. पण सध्या विराट कोहली खेळत नाही. ज्यांना आपण ओळखतोय. ज्याने आपले नाव वर्ल्डमध्ये निर्माण केले आहे. जर कोहली कामगिरी करत नसेल तर तुम्ही युवा खेळाडूंना बाहेर बसवु शतक नाही.