किदांबी श्रीकांतची फ्रेंच ओपनच्या सेमीफायनलमध्ये धडक

भारताचा स्टार बॅडमिंटनपटू किदाम्बी श्रीकांत फ्रेंच ओपनच्या उपांत्य फेरीत पोहचला आहे. फ्रेंच ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीत श्रीकांतने चीनच्या शी यू क्वी याचा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला.

Updated: Oct 28, 2017, 11:11 AM IST
किदांबी श्रीकांतची फ्रेंच ओपनच्या सेमीफायनलमध्ये धडक title=

नवी दिल्ली : भारताचा स्टार बॅडमिंटनपटू किदाम्बी श्रीकांत फ्रेंच ओपनच्या उपांत्य फेरीत पोहचला आहे. फ्रेंच ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीत श्रीकांतने चीनच्या शी यू क्वी याचा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला.

पहिला सेट चीनच्या खेळाडूने 21-8 ने जिंकला, परंतु नेहमीप्रमाणे श्रीकांतला दुसऱ्या सेटमध्ये कडवी झुंज देत संघर्ष केला. दोन्ही खेळाडू 19-19 स्कोअरवर होते. पण शेवटी श्रीकांतने 21-19 ने क्वीचा पराभव केला. अंतिम आणि निर्णायक सेटमध्ये श्रीकांतने पूर्णपणे वर्चस्व राखलं. शेवटचा सेट त्याने 21-9 ने जिंकला.