कॅलेंडर वर्षात चार सुपर सीरिज जिंकणारा किदम्बी पहिला भारतीय बॅडमिंटनपटू

भारताचा अव्वल टेनिस खेळाडू के. श्रीकांतचा विजयाचा धडाका सुरुच आहे. आता त्यानं फ्रेंच ओपन सुपर सीरिजच्या विजेतेपदाला गवसणी घातलीय. या हंगामातील हे त्याचं चौथ सुपर सीरिज विजेतेपद ठरलय. अशी कामगिरी करणारा तो पहिला भारतीय ठरलाय. 

Updated: Oct 30, 2017, 04:49 PM IST
कॅलेंडर वर्षात चार सुपर सीरिज जिंकणारा किदम्बी पहिला भारतीय बॅडमिंटनपटू  title=

मुंबई : भारताचा अव्वल टेनिस खेळाडू के. श्रीकांतचा विजयाचा धडाका सुरुच आहे. आता त्यानं फ्रेंच ओपन सुपर सीरिजच्या विजेतेपदाला गवसणी घातलीय. या हंगामातील हे त्याचं चौथ सुपर सीरिज विजेतेपद ठरलय. अशी कामगिरी करणारा तो पहिला भारतीय ठरलाय. 

किदम्बी श्रीकांत...पी. गोपीचंदच्या अॅकॅडमीतील हा अजून एक हिरा...आतापर्यंत महिला बॅडमिंटनमध्ये भारताला जिंकण्याची सवय होती. मात्र आता के. श्रीकांतनं पुरुष भारतीय खेळाडूही काही कमी नसून ते जिंकू शकतात हे जगाला दाखवून दिलय. 

एका आठवड्याभरात त्यानं दुस-या विजेतेपदाला गवसणी घातलीय. फ्रेंच ओपन सुपर सीरिजच्या फायनलमध्ये जपानच्या केंटो निशिमोटोला श्रीकांतनं 21-14, 21-13 असं सहज पराभूत केलं. केवळ 34 मिनिटांमध्ये श्रीकांतनं हा विजय साकारला. या विजयाबरोबरच एका हंगामात चार सुपर सीरिज जिंकण्याची किमया त्यानं केली. 

या हंगामात त्यानं इंडोनेशिया सुपर सीरिज, ऑस्ट्रेलिया सुपर सीरिज आणि डेन्मार्क सुपर सीरिजं जिंकली असून आता त्यानं फ्रेंच ओपन सुपर सीरिजला गवसणी घालत इतिहास रचला. अशी कामगिरी करणारा तो पहिला भारतीय ठरलाय. वर्ल्ड नंबर फोर असलेल्या श्रीकांतनं फायनलमध्ये केंटो निशिमोटोवर पहिल्यापासूनच वर्चस्व प्रस्थापित केलं. 

पहिल्या गेममध्ये थोडा मागे पडताच श्रीकांतनं आक्रमक पवित्रा धारण करत केवळ 16 मिनिटांमध्ये पहिला गेम खिशात घातला. तर दुस-या गेममध्ये त्यानं अधिकच आक्रमक खेळ करत दुसरा गेमही जिंकला. 

गोपीचंद यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीकांतनं डबल्समधून सिंगल्स खेळण्याचा निर्णय घेतला आणि तो यशस्वीही करुन दाखवला. श्रीकांतचा हा विजयी धडाका असाच सुरु राहीला तर आगामी काळात अनेक स्पर्धांमध्ये तो भारताला विजय पटकावून देऊ शकतो.