बॅडमिंटनपटू किदांबी श्रीकांतचं पंतप्रधान मोदींनी केलं अभिनंदन

ओपन सुपर सिरीज फ्रेंच ओपनचं जेतेपद जिंकण्यारा भारताचा स्टार बॅडमिंटनपटू किदांबी श्रीकांतचं पंतप्रधान मोदींनी अभिनंदन केले आहे.

Updated: Oct 30, 2017, 04:38 PM IST
बॅडमिंटनपटू किदांबी श्रीकांतचं पंतप्रधान मोदींनी केलं अभिनंदन title=

नवी दिल्ली : ओपन सुपर सिरीज फ्रेंच ओपनचं जेतेपद जिंकण्यारा भारताचा स्टार बॅडमिंटनपटू किदांबी श्रीकांतचं पंतप्रधान मोदींनी अभिनंदन केले आहे.

पंचप्रधान मोदींनी शुभेच्छा देत म्हटलं आहे की, श्रीकांतकडून चांगल्या बातम्या मिळत आहेत. फ्रेंच ओपन सुपर सीरिजमध्ये सुंदर विजय. संपूर्ण देशाला अभिमान आहे.भारताचा स्टार बॅडमिंटनपटू किदांबी श्रीकांतने पॅरिसमध्ये 21-12, 21-13 ने सरळ आणि सोपा असा विजय मिळवला. त्याने जपानच्या केंटा निशिमोतोचा पराभव केला. 

पुरुष एकेरीत फ्रेंच ओपन सुपर सिरीजचं शिर्षक त्याने आपल्या नावे करत आणखी एक सर्वोत्तम कामिगिरी केली आहे. बॅडमिंटन स्पर्धेच्या इंडोनेशिया ओपन, ऑस्ट्रेलियन ओपन आणि डेन्मार्क ओपननंतर हे श्रीकांतचं चौथं सुपर सीरिज विजेतेपद आहे.