6,6,6,W,6,6 शिवम मावीला धू धू धुतला; लखनऊचा रनांचा पाऊस

IPL 2022 च्या 53व्या मॅच मध्ये लखनऊ सुपरजाइंट्स (LSG)  ने पहिली बॅटिंग करत सात विकेटच्या मोबदल्यात 176 यांची खेळी केली.  जिंकण्यासाठी कोलकत्ता नाइट रायडर्सला (KKR)  177 रन गरज होती. असं वाटलं होतं लखनऊ सुपरजाएंट्सच्या इनिंगला 150 ते 160 च्यामध्ये ब्रेक लागेल. पण 19 व्या ओव्हरने मॅचचा चेहरा मोहराच बदलला.

Updated: May 8, 2022, 07:51 AM IST
6,6,6,W,6,6 शिवम मावीला धू धू धुतला; लखनऊचा रनांचा पाऊस title=

पुणे: IPL 2022 च्या 53व्या मॅच मध्ये लखनऊ सुपरजाइंट्स (LSG)  ने पहिली बॅटिंग करत सात विकेटच्या मोबदल्यात 176 यांची खेळी केली.  जिंकण्यासाठी कोलकत्ता नाइट रायडर्सला (KKR)  177 रन गरज होती. असं वाटलं होतं लखनऊ सुपरजाएंट्सच्या इनिंगला 150 ते 160 च्यामध्ये ब्रेक लागेल. पण 19 व्या ओव्हरने मॅचचा चेहरा मोहराच बदलला.

लखनऊचा स्कोअर 18 व्या ओव्हरच्या समाप्तीनंतर चार विकेटच्या मोबदल्यात 142 रन होता. असं वाटलं होतं की लखनऊला 160 धावांवर वेसण घालता येईल. पण तसं काही झालंच नाही. केकेआर चा कॅप्टन श्रेयस अय्यर (Shreyas Iyer)  ने 19 वी ओव्हर शिवम मावीला (Shivam Mavi) दिली आणि मॅचचा नूरच पालटला. शिवमच्या या ओव्हरमध्ये एक- दोन नव्हे तर तब्बल 5 सिक्सर ठोकण्यात आले. आणि एका ओव्हरमध्येच लखनऊला 30 धवांची घसघशीत वाढ मिळाली. 

शिवमच्या पहिल्या तीन बॉलवर स्टोइनिसने (Marcus Stoinis) सिक्सची हॅट्ट्रीक केली. चौथ्या बॉलवर तो आऊट झाला.स्टोइनिस आऊट होताच मैदानावर आला तो ऑल राऊंडर जेसन होल्डर( Jason Holder).स्टोइनिस आऊट झाल्यानंतर वाटलं होतं धावांचा पाऊस रोखला जाईल. मात्र तसं काही झालंच नाही. जेसन होल्डरनं सुद्धा धडकेबाज बॅक टू बॅक दोन सिक्स लगावले.

19वी ओव्हर लखनऊसाठी रनांची दिवाळीच घेऊन आली होती. विशेष म्हणजे स्टोइनिसचा कॅच जर चौथ्या बॉलला घेतला गेला नसता तर तो सुद्धा सिक्स ठरला असता. आणि पुन्हा एकदा क्रिकेट रसिकांना कदाचित सहा बॉलला सहा सिक्स पाहाण्याचा योग आला असता.