एबीने उडवला कोलकाता रायडर्सचा धुव्वा, आरबीचं १९५ रन्सचं आव्हान

 एबीच्या विस्फोटक खेळीमुळे आरसीबी २ विकेटच्या बदल्यात १९४ रन्स 

Updated: Oct 12, 2020, 11:44 PM IST
एबीने उडवला कोलकाता रायडर्सचा धुव्वा, आरबीचं १९५ रन्सचं आव्हान  title=

शारजाह : आयपीएल १३ मधील २८ वी मॅच रॉयल चॅलेंजर्स बॅंगलोर आणि कोलकाता नाईट रायडर्समध्ये खेळली जात आहे. बंगलोरने रायडर्सना २० ओव्हरमध्ये १९५ रन्सचे लक्ष्य दिले. बंगलोरच्या एबी डीव्हीलीअर्सने नाबाद ७३ रन्स केले. ३३ बॉलमध्ये ५ फोर आणि ६ सिक्सर्सच्या मदतीने खेळी केली. एबीच्या विस्फोटक खेळीमुळे आरसीबी दोन विकेटच्या बदल्यात १९४ रन्स पर्यंत पोहोचली. 

बंगळोरचा फलंदाज एरोन फिंचला कोलकाताचा फास्ट बॉलर प्रसिद्ध कृष्णाने ४७ रन्सवर बोल्ड केलं.