मुंबई : बीसीसीआयने २०१९-२० या वर्षासाठी टीम इंडियाच्या खेळाडूंसाठी करार केला. या करारामध्ये धोनीचा समावेश करण्यात आला नाही, त्यामुळे धोनीच्या भवितव्याबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरु झाल्या. वादग्रस्त विधान करणाऱ्या केआरकेनेही यामध्ये उडी घेतली. पण केआरकेने केलेल्या ट्विटमुळे त्याच्यावर ट्रोल व्हायची वेळ आली. केआरकेच्या या ट्विटवर कमेंट करताना अनेकांनी टीका केली आहे.
आज बीसीसीआयने इतर खेळाडूंप्रमाणेच धोनीला धक्के मारुन बाहेर काढलं. धोनी हा मानानं निवृत्त होईल असं मला वाटत होतं, पण त्यानेही इतर खेळाडूंच्या पावलावर पाऊल टाकलं. 'जब तक धक्के मारकर नही निकालोगे, तब तक नही निकलुंगा', हे दु:खद आहे, असं ट्विट केआरकेने केलं. या ट्विटनंतर केआरकेवर अनेकांनी निशाणा साधला. पण टीका झाल्यानंतर केआरकेने हे ट्विट डिलीट केलं.
MSD s' passion is to serve country and your passion is humiliate & abuse yourself as much as can
— KrisHna SiNGH BHaaTi (@singh_bhaati) January 17, 2020
#MSDhoni is not like u @kamaalrkhan in bollywood. Bollywood threw out u from industry still u r trying but no 1 accept. So think before speak that ki kiske baare me bol rhe ho...
— Saurabh Arora (@Saurabh76707892) January 17, 2020
He is a historical hero .. dhoni desrves respect ....do not use those shitty words like dhakkha and all for him
— Ne_s_r (@Nasarahamad15) January 17, 2020
२०१९ वर्ल्ड कपमध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या सेमी फायनलनंतर धोनी क्रिकेट खेळला नाही. बीसीसीआयने केलेला हा करार ऑक्टोबर २०१९ ते सप्टेंबर २०२० पर्यंतचा आहे, त्यामुळे धोनीशी करार करण्यात आला नसल्याचं बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं. तसंच धोनीशी करार झाला नाही, म्हणजे तो भारताकडून खेळू शकणार नाही, असा त्याचा अर्थ होत नाही, असंही बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने स्पष्ट केलं.
एमएस धोनी हा २०२० सालचा टी-२० वर्ल्ड कप खेळू शकतो, असे संकेत टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी दिली आहेत. धोनी टी-२० वर्ल्ड कप खेळणार का नाही ते आयपीएलमधल्या धोनीच्या आणि इतर खेळाडूंच्या कामगिरीवर अवलंबून आहे, असं रवी शास्त्री म्हणाले होते.