टीम इंडियाच्या 'या' क्रिकेटरला पितृशोक... सोडावी लागली टूर्नामेंट

भारतीय संघाने शोकाकुळ 

Updated: Jan 16, 2021, 12:24 PM IST
टीम इंडियाच्या 'या' क्रिकेटरला पितृशोक... सोडावी लागली टूर्नामेंट  title=

मुंबई : टीम इंडियाचे स्टार ऑलराउंडर हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि क्रुणाल पांड्या (Krunal Pandya) यांना पितृशोक झाला आहे. शनिवारी सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचं निधन झालं आहे. वडिलांच्या अशा अचानक जाण्याने पांड्या कुटुंबियांवर दुःखाचं डोंगर कोसळलं आहे. 

टूर्नामेंट सोडून परतला क्रुणाल पांड्या 

सय्यद मुश्ताक अली टी-20 ट्रॉफीकरता बडोदाकडून खेळत असलेला क्रिकेटर क्रुणाल पांड्या खेळ सोडून घरी परतला आहे. बडोदा क्रिकेट असोसिएसनचे सीईओ शिशिर हट्टंगडी यांनी दिलेल्या माहितीनुसार,'क्रुणाल पांड्याने टीमचं बायो बबल सोडलं आहे. आता क्रुणाल पांड्या आणि त्याच्या कुटुंबियांसाठी अत्यंत दुःखाची बातमी आहे. बडोदा क्रिकेट असोसिएशन हार्दिक पांड्या आणि क्रुणाल पांड्या वडिलांच्या निधनामुळे दुःखात आहेत.'

Hardik Pandya Father Death: दिल का दौड़ा पड़ने से हार्दिक पांड्या के पिता का निधन, Krunal Pandya ने छोड़ा टूर्नामेंट

क्रुणालने उत्तराखंड विरुद्ध पहिल्या सामन्यात ७६ धावा केल्या असून तीन सामन्यात चार गडी बाद केले आहेत. 

खेळाडूंनी वाहिली श्रद्धांजली विराट कोहलीने हार्दिक आणि क्रुणाल पांड्याच्या वडिलांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. त्यांनी ट्विट करत म्हटलं आहे की,'हार्दिक आणि क्रुणालच्या वडिलांच्या निधनामुळे खूप दुःख झालं. मी अनेकदा त्यांच्याशी गप्पा मारल्या आहेत. त्यांच खूप आनंदीच व्यक्तीमत्व होतं. देव त्यांच्या आत्मास शांती देवो... तुम्ही दोघं एकत्र राहा... '

भारताचे माजी गोलंदाज इरफान पठानने देखील ट्विट केलं आहे. 'अंकलची सर्वात पहिली भेट ही मोतीबागमध्ये झाली होती. त्यांना कायमच वाटायचं की त्यांच्या मुलांनी चांगल क्रिकेट खेळावं. तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे. '

हार्दिक आणि क्रुणाल या दोघांनी कायमच आपल्या यशाचं श्रेय हे वडिलांना दिलं आहे. दोघांच्या यशस्वी क्रिकेट खेळण्यामागे त्यांच्या वडिलांची मेहनत आहे.