कुलदीप का अक्षर? तिसऱ्या टेस्टमध्ये कोहली कोणाला खेळवणार?

श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टसाठी रवींद्र जडेजाचं निलंबन करण्यात आलं.

Updated: Aug 9, 2017, 08:49 PM IST
कुलदीप का अक्षर? तिसऱ्या टेस्टमध्ये कोहली कोणाला खेळवणार? title=

कोलंबो : श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टसाठी रवींद्र जडेजाचं निलंबन करण्यात आलं. निलंबनाच्या कारवाईमुळे तिसऱ्या टेस्टसाठी आता जडेजाच्याऐवजी अक्षर पटेलची निवड करण्यात आली आहे. अक्षर पटेलची निवड केल्यामुळे आता अंतिम ११ खेळाडूंमध्ये कोणाची निवड होणार हा प्रश्न आहे.

तिसऱ्या टेस्टमध्ये दुसरी टेस्ट खेळलेली टीमच उतरेल फक्त जडेजाच्याऐवजी अक्षर पटेलला संधी मिळेल का कुलदीप यादवला याबाबत विराट कोहली काय निर्णय घेणार हे पाहाणं औत्सुक्याचं ठरणार आहे. श्रीलंकेविरुद्धची तिसरी टेस्ट १२ ऑगस्टपासून कॅन्डीमध्ये खेळवली जाणार आहे. ३ टेस्ट मॅचच्या या सीरिजमध्ये भारतानं २-०ची विजयी आघाडी घेतली आहे. तिसऱ्या टेस्टमध्ये भारत श्रीलंकेला व्हाईट वॉश करण्यासाठी मैदानात उतरेल.