Lionel Messi cries after ankle injury : हृदयाचे ठोके वाढवणाऱ्या कोपा अमेरिकाच्या फायनल (Copa America final) सामन्यात अर्जेंटिनाने कोलंबियाचा पराभव करत दणदणीत 1-0 ने विजय मिळवला. अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लॉटारो मार्टिनेझ याने केलेल्या गोलमुळे अर्जेंटिनाने 16 वेळा कोपा अमेरिका कपवर नाव कोरलं आहे. अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलर लिओनेल मेस्सी सामन्यादरम्यान (Argentina vs Colombia ) जखमी झाल्याने अनेकांना टेन्शन आलं होतं. सामन्याच्या 66 व्या मिनिटाला मेस्सीला (Lionel Messi) दुखापतीमुळे मैदान सोडावं लागलं होतं.
कोपा अमेरिका फायनलच्या दुसऱ्या हाफमध्ये लिओन मेस्सी खेळत असताना तो जखमी झाला. पळताना त्याचा पाय मुरगळ्याचं दिसून आलं. त्यानंतर त्याला मैदान सोडावं लागलं. मेस्सी बाहेर गेल्याचं पाहताच चाहत्याच्या डोळ्यात पाणी आलं. तर दुसरीकडे मेस्सी देखील डगआऊटमध्ये बसल्यावर ढसाढसा रडू लागला. सामना अंतिम टप्प्यात असताना आपण काहीही करू शकत नाही, याची जाणीव मेस्सीला सुजलेल्या पायाकडे पाहून झाली. मेस्सीचा रडतानाचा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे.
Messi is in tears as he is subbed off due to injury pic.twitter.com/t0l3OLLuWf
— FOX Soccer (@FOXSoccer) July 15, 2024
मेस्सी बाहेर गेल्यावर निकोलस गोन्झालेज याला मैदानात पाठवण्यात आलं. त्यावेळी मेस्सीचा चेहरा उदास दिसत होता. सामन्याची वेळ संपली तेव्हा दोन्ही संघाला एकही गोल करता आला नाही. त्यामुळे अतिरिक्त वेळ देण्यात आला. सामन्याच्या 112 व्या मिनिटाला लॉटारो मार्टिनेझने अर्जेंटिनासाठी गोल नोंदवला आणि आघाडी कायम ठेवली. लॉटारो मार्टिनेझच्या गोलनंतर मेस्सीच्या चेहऱ्यावरचा आनंद गगनात मावेना झाला होता.
No Lionel Messi fan will pass without liking this.
From NO international trophy to winning every international Trophy
— ACE (fan) (@FCB_ACEE) July 15, 2024
फिफा वर्ल्ड कपनंतर मेस्सी निवृत्ती घेईल, अशी चर्चा झाली होती. अशातच आता मेस्सीचा भावूक झालेला चेहरा पाहुन मेस्सी निवृत्तीच्या मार्गावर आहे का? असा सवाल विचारला जात आहे. कोपा अमेरिका विजेतेपद जिंकल्यानंतर मेस्सीने 45 वी सीनियर ट्रॉफी जिंकली, ज्यामुळे तो फुटबॉल इतिहासातील सर्वाधिक ट्रॉफी मिळवणारा खेळाडू बनला आहे.