Ind vs Aust T20 Live Update : वर्ल्डकपनंतर टी-२० च्या पहिल्या सामन्यात टीम इंडियाचा २ विकेट्सने कांगारूंवर विजय

Ind vs Aust T20 Live Update : भारत-ऑस्ट्रेलियादरम्यान पाच सामन्यांची टी20 मालिका खेळवली जाणार आहे.  या मालिकेत टीम इंडियाच्या युवा खेळाडूंची कसोटी लागणार आहे. 

Ind vs Aust T20 Live Update : वर्ल्डकपनंतर टी-२० च्या पहिल्या सामन्यात टीम इंडियाचा २ विकेट्सने कांगारूंवर विजय

Ind vs Aust T20 Live Update : आयसीसी विश्वचषक स्पर्धेनंतर भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान पाच सामन्यांची टी20 मालिका खेळवली जाणार आहे. यातला पहिला टी20 सामना आज विशाखापट्टनममध्ये खेळवला जातोय. टीम इंडियात सीनिअर खेळाडूंना विश्रांती देण्यात आली असून युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. या संघाची धुरा सूर्यकुमार यादवकडे सोपवण्यात आलीय. तर ऑस्ट्रेलियात अनुभवी खेळाडूंचा भरणा आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्ध टीम इंडियाच्या युवा खेळाडूंची परीक्षा असणार आहे. 

23 Nov 2023, 19:58 वाजता

Ind vs Aust T20 Live
पहिली बॅटिंग करणाऱ्या ऑस्ट्रेलियाने 13 षटकात 120 धावांचा टप्पा पार केला आहे. जोश इंग्लिसने अवघ्या 37 चेंडूत 4 षटकार आणि 7 चौकार लगावत 66 धावा केल्या आहेत. तर सलामीला आलेला स्टिव्ह स्मिथही खेळपट्टीवर उभा आहे. रवि बिश्नोईने एक विकेट घेतलीय.

 

23 Nov 2023, 18:57 वाजता

Ind vs Aust T20 Live
भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान पाच सामन्यांची टी20 मालिका (India vs Australia First T20) खेळवली जातेय. टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने टॉस जिंकून पहिली गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. ऑस्ट्रेलिया पहिली फलंदाजी करणार आहे. टीम इंडियात वेगवान गोलंदाजीची धुरा प्रसिद्ध कृष्णा, मुकेश कुमार आणि अर्शदीप सिंगवर आहे. तर रवी बिश्नोई आणि अक्षर पटेल फिरकीची जबाबदारी सांभाळतील

23 Nov 2023, 17:28 वाजता

Ind vs Aust T20 Live
भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान पाच सामन्यांची टी20 मालिका (India vs Australia First T20) खेळवली जातेय. मालिकेतला पहिला सामना आज विशाखापट्टनमध्ये (Visakhapatnam) रंगणार आहे. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी सात वाजता सामन्याला सुरुवात होईल. टी20 मालिकेसाठी भारतीय संघातील दिग्गजांना विश्रांती देण्यात आली असून युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. टीम इंडियाची जबाबदारी सूर्यकुमार यादवकडे असणार आहे.