Ind vs Aust T20 Live Update : वर्ल्डकपनंतर टी-२० च्या पहिल्या सामन्यात टीम इंडियाचा २ विकेट्सने कांगारूंवर विजय

Ind vs Aust T20 Live Update : भारत-ऑस्ट्रेलियादरम्यान पाच सामन्यांची टी20 मालिका खेळवली जाणार आहे.  या मालिकेत टीम इंडियाच्या युवा खेळाडूंची कसोटी लागणार आहे. 

Ind vs Aust T20 Live Update : वर्ल्डकपनंतर टी-२० च्या पहिल्या सामन्यात टीम इंडियाचा २ विकेट्सने कांगारूंवर विजय

Ind vs Aust T20 Live Update : आयसीसी विश्वचषक स्पर्धेनंतर भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान पाच सामन्यांची टी20 मालिका खेळवली जाणार आहे. यातला पहिला टी20 सामना आज विशाखापट्टनममध्ये खेळवला जातोय. टीम इंडियात सीनिअर खेळाडूंना विश्रांती देण्यात आली असून युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. या संघाची धुरा सूर्यकुमार यादवकडे सोपवण्यात आलीय. तर ऑस्ट्रेलियात अनुभवी खेळाडूंचा भरणा आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्ध टीम इंडियाच्या युवा खेळाडूंची परीक्षा असणार आहे. 

23 Nov 2023, 22:27 वाजता

Ind vs Aust T20 Live Update : टीम इंडियाची पाचवी विकेट, सूर्यकुमार यादव ८० रन्सवर बाद

23 Nov 2023, 22:13 वाजता

Ind vs Aust T20 Live Update : टीम इंडियाचे १५ ओव्हर्समध्ये १६० रन्स पूर्ण

23 Nov 2023, 22:05 वाजता

Ind vs Aust T20 Live Update : कर्णधार सूर्यकुमार यादवने पहिल्याचं सामन्यात ठोकलं अर्धशतक, टीम इंडियाने गमावल्या ३ विकेट्स

23 Nov 2023, 21:59 वाजता

Ind vs Aust T20 Live Update : इशान किशनच्या रूपाने टीम इंडियाला तिसरा धक्का बसला, ५८ रन्सवर इशान बाद

23 Nov 2023, 21:56 वाजता

Ind vs Aust T20 Live Update : इशान किशनने कांगारूंच्या गोलंदाजांना धुतलं, ३७ चेंडूंमध्ये ठोकलं अर्धशतक

23 Nov 2023, 21:48 वाजता

टीम इंडियाच्या डावातील 10 ओव्हर्सचा खेळ संपला आहे. 2 विकेट गमावून 106 रन्स पूर्ण झालेत.

23 Nov 2023, 21:40 वाजता

Ind vs Aust T20 Live Update : ९.१ ओव्हर्समध्ये टीम इंडियाने १०० रन्स पूर्ण केले आहेत. सूर्यकुमार आणि इशानची तुफान फलंदाजी

23 Nov 2023, 21:08 वाजता

Ind vs Aust T20 Live
209 धावांचं आव्हान समोर ठेऊन खेळणाऱ्या टीम इंडियाला पहिल्याच षटकात मोठा धक्का बसला उपकर्णधार ऋतुराज गायकवाड शुन्यावर बाद झाला. त्यानंतर सलामीवीर यशस्वी जयस्वालने आक्रमक सुरुवात केली खरी पण तोही फार काळ मैदानावर टीकला नाही. सामन्याच्या तिसऱ्या षटकात मॅथ्यू श़ॉर्टच्या गोलंदाजीवर तो मोठा फटका मारण्याच्या नादात झेलबाद झाला. यशस्वी जयस्वालने 8 चेंडूत 21 धावा केल्या. यात त्याने 2 षटकार आणि 2 चौकार लगावले.

23 Nov 2023, 20:44 वाजता

Ind vs Aust T20 Live
पहिली बॅटिंग करणाऱ्या ऑस्ट्रेलियाने तीन विकेटच्या मोबदल्यात 208 धावांचा डोंगर उभा केला आहे. जोस इंग्लिसने 110 धावांची तुफानी खेळी केली. यात त्याने 8 षटकार आणि 11 चौकार लगावले. तर स्टिव्ह स्मिथने 52 धावा केल्या. भारतातर्फे प्रसिद्ध कृष्णा आणि रवी बिश्नोईने प्रत्येकी एक विकेट घेतली.

23 Nov 2023, 20:20 वाजता

Ind vs Aust T20 Live
पहिली बॅटिंग करणाऱ्या ऑस्ट्रेलियाने दोन विकेटच्या मोबदल्यात 170 धावांचा टप्पा पार केला आहे. स्टिव्हन स्मिथ 52 धावा करुन बाद झाला. पण जोस इंग्लिसने आक्रमक फलंदाजी करत शतक ठोकलं. अवघ्या 49 चेंडूत इंग्लिसने 8 षटकार आणि 11 चौकारांची बरसात केली.