CSK vs GT Highlights : चेन्नईचा सलग दुसरा विजय, गुजरातला पाजलं पराभवाचं पाणी

CSK vs GT Live Score IPL 2024 : चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स (CSK vs GT) यांच्यात आयपीएलचा 7 वा सामना खेळवला जाणार आहे. शुभमन गिल आणि ऋतुराज गायकवाड (Shubman Gill vs Rituraj Gaikwad) पहिल्यांदा कॅप्टन म्हणून आमने सामने असतील.

CSK vs GT Highlights : चेन्नईचा सलग दुसरा विजय, गुजरातला पाजलं पराभवाचं पाणी

Chennai Super Kings vs Gujarat Titans : आयपीएलचा 7 वा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर रंगणार आहे. या सामन्यात दोन युवा कर्णधार भिडतील. एकीकडे शुभमन गिल तर दुसरीकडे धोनीच्या मार्गदर्शनाखाली ऋतुराज गायकवाड खेळेल. त्यामुळे आता पुन्हा एकदा होम टीम जिंकणार की शुभमन गिल फायलनच्या पराभवाचा बदला घेणार? असा सवाल विचारला जात आहे. गुजरात टायटन्सचा चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध आतापर्यंत खेळल्या गेलेल्या पाचपैकी तीन सामन्यांमध्ये विजय मिळवण्याचा चांगला रेकॉर्ड आहे.

26 Mar 2024, 23:40 वाजता

 शिवम दुबेची (Shivam Dube) आक्रमक फलंदाजी अन् ऋतुराजच्या (Ruturaj Gaikwad) स्मार्ट कॅप्टन्सीमुळे चेन्नईने दुसरा विजय नोंदवला आहे. त्याचबरोबर आता चेन्नईने पाईंट्स टेबलमध्ये (IPL 2024 Points Table) देखील अव्वल स्थान गाठलं.

26 Mar 2024, 23:08 वाजता

गुजरात पराभवाच्या उंभरठ्यावर आहे. गुजरातला विजयासाठी अखेरच्या 4 ओव्हरमध्ये 88 धावांची गरज आहे. राहुल तेवतिया जलवा दाखवणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरतंय.

26 Mar 2024, 22:09 वाजता

CSK vs GT LIVE :
चेन्नई सुपर किंग्सने विजयासाठी गुजरात टायटन्ससमोर 207 धावांचं आव्हान ठेवलं आहे. याला उत्तर देताना गुजरातने 35 धावांवर दोन विकेट गमावले. सलामीला आलेरा कर्णधार शुभमन गिल अवघ्या 8 धावा करुन बाद झाला. तर वृद्धीमान साहा 21 धावांवर पॅव्हेलिअनमध्ये परतला. चेन्नईचा वेगवान गोलंदाज दीपक चहरने दोन्ही विकेट घेतल्या.

26 Mar 2024, 21:28 वाजता

प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेल्या गुजरातला कॅप्टन शुभमन गिलचा निर्णय भारी पडला. चेन्नईने पहिल्यांदा फलंदाजी करताना 206 धावा उभ्या केल्या आहेत. चेन्नईकडून शिवम दुबे याने आक्रमक फलंदाजी करत चेन्नईला 200 पार पोहोचवलं. शिवमने 5 सिक्स अन् 2 फोरच्या मदतीने 23 बॉलमध्ये 51 धावांची खेळी केली. तर सलामीवीर रचिन रविंद्र आणि ऋतुराज गायकवाड यांनी प्रत्येकी 46 धावांची खेळी केली. अखेरीस चेन्नईचा समीर रिझवी चमकला. दोन  खणखणीत सिक्स मारत समीरने 6 बॉलमध्ये 14 धावा कुटल्या. तर गुजरातकडून राशिद खानने 4 ओव्हरमध्ये 49 धावा देत 2 विकेट्स घेतल्या.           

26 Mar 2024, 21:13 वाजता

शिवम दुबेने आक्रमक खेळी करत 23 बॉलमध्ये 51 धावा केल्या. त्यात त्याने 5 सिक्स अन् 2 फोर मारले. त्याच्या या वादळी खेळीमुळे चेन्नई 200 पार गेली आहे.

26 Mar 2024, 20:56 वाजता

CSK vs GT LIVE 150 धावांची खेळी असून 15 चेंडूत शिवमने 1 चौकार तर 4 षटकार ठोकले. मिचेल आणि दुबे भागीदारीत आक्रमक फटकेबाजी करत चेन्नई गुजरातच्या गोलंदाजीला चोख उत्तर देत आहे. 

 

26 Mar 2024, 20:45 वाजता

CSK vs GT LIVE  ऋतूराज गायकवाडचं अर्धशतक हुकलं. जॉनसॉनने ऋतूराजची 46 धावांवर विकेट घेतली. चेन्नाईला तिसरा धक्का मिळाल्यानंतर आता मिचेल फलंदाजीकरीता मैदानात उतरला. पहिलाच चौकार मारत मिचेलने आक्रमक सुरुवात केली तर  दुबेने आतापर्यंत 18 धावा केल्यात. चेन्नईने 14 ओव्हरमध्ये 141 धावा केल्या आहेत. 

26 Mar 2024, 20:31 वाजता

CSK vs GT LIVE गुजरातने दुसरी विकेट घेतली आसता आता शिवम दुबे फलंदाजीसाठी मैदानात उतरला आहे. दुबेने तीन चेंडूत दोन षटकार मारत सुरुवात दमदार केली. 11 ओव्हरमध्ये चेन्नईचे 120 धावांची यशस्वी खेळी झाली आहे. 

26 Mar 2024, 20:19 वाजता

CSK vs GT LIVE गुजरातच्या गोलंदाजीला आक्रमक फटकेबाजी करत चेन्नईने 98ओव्हरमध्ये 1 विकेट गेली असून 98 धावांची खेळी केली आहे.  रहाणे आणि ऋतूराजची तुफान फटकेबाजी सुरू असून स्पेन्सरच्या गोलंदाजीला ऋतूराजने षटकार ठोकला आहे. 

 

26 Mar 2024, 20:04 वाजता

CSK vs GT LIVE :चेन्नईने सुरूवातच दमादार केली.फलंदाजीकरीता मैदानात उतरलेले सलामीवीर रचिन रवींद्र आणि ऋतूराजची आक्रमक फटकेबाजी सुरु आहे. भागीदारीमध्ये फलंजदाजी करत दोघांनी 5 ओव्हरमध्ये चेन्नईसाठी 60 धावांची दमदार कामगिरी केली आहे. मात्र राशिदने रचिन रवींद्रला 46 धावांवर बाद केलं आहे. अजिंक्य रहाणेने आता मैदानात उतरत फलंदाजी धुरा हाती घेतली आहे.