kkr in playoffs : मुंबई इंडियन्सचा 18 धावांनी पराभव, केकेआरची प्लेऑफमध्ये धडक

Kolkata Knight Riders vs Mumbai Indians Live Updates : आयपीएलचा 60 वा सामना मुंबई इंडियन्स आणि कोलकाचा नाईट रायडर्स यांच्यात होणार आहे.

kkr in playoffs : मुंबई इंडियन्सचा 18 धावांनी पराभव, केकेआरची प्लेऑफमध्ये धडक

MI vs KKR Live Score : कोलकाता नाईट रायडर्सचा (KKR) आज घरच्या मैदानावर ईडन गार्डन्सवर सामना मुंबई इंडियन्सशी होत आहे. मुंबई संघासाठी या सामन्यात गमावण्यासारखे काही नाही, परंतु केकेआरला हा सामना जिंकून प्लेऑफचे तिकीट निश्चित करण्याची संधी असेल. 

11 May 2024, 21:17 वाजता

KKR ची दमदार सुरुवात. पहिल्याच बॉलमध्ये मारला सिक्स. 

11 May 2024, 21:10 वाजता

मुंबई इंडियन्स (प्लेइंग इलेव्हन) : इशान किशन (wk), नमन धीर, सूर्यकुमार यादव, टिळक वर्मा, नेहल वढेरा, हार्दिक पांड्या (C), टिम डेव्हिड, अंशुल कंबोज, पियुष चावला, जसप्रीत बुमराह, नुवान तुषारा.

कोलकाता नाइट रायडर्स (प्लेइंग इलेव्हन): फिलिप सॉल्ट (wk), सुनील नरेन, व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (c), रिंकू सिंग, नितीश राणा, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती.

11 May 2024, 20:43 वाजता

ईडन गार्डन्सवर अखेर पाऊस थांबला असून नऊ वाजता टॉस होणार आहे. तर सामना सव्वानऊ वाजता खेळवला जाईल.

11 May 2024, 20:35 वाजता

कोलकात्यात पाऊस थांबल्यानंतर आता पंच रात्री 8.45 वाजता मैदानाची पाहणी करतील, त्यानंतर सामना कधी सुरू होईल का? याचा निर्णय घेतला जाईल.

11 May 2024, 19:53 वाजता

11 May 2024, 19:51 वाजता

केकेआरने चालू आयपीएल हंगामात आतापर्यंत 11 पैकी 8 सामने जिंकले असून केकेआर पाईट्स टेबलच्या टॉपवर आहे. तर दुसरीकडे, मुंबईने 12 पैकी केवळ 4 सामने जिंकले असून ते प्लेऑफच्या शर्यतीतून संघ बाहेर झाला आहे.

11 May 2024, 19:49 वाजता

सामन्यात पावसाचा खोडा

ईडन गार्डन्सवर केकेआर आणि मुंबई यांच्यातील सामना पावसाने वाहून जाण्याची शक्यता आहे. पावसामुळे त्यामुळे नाणेफेक उशीर होत आहे. सध्या कोलकात्यात पाऊस पडत असून मैदान पूर्णपणे कव्हर्सने झाकले आहे.