कपिल देवच्या मृत्यूच्या बातमीवर भडकले मदनलाल

सोशल मीडियावर देव यांच्या निधनाची बातमी व्हायरल 

Updated: Nov 3, 2020, 12:39 PM IST
कपिल देवच्या मृत्यूच्या बातमीवर भडकले मदनलाल

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाटे माजी दिग्गज ऑलराऊंडर कपिल देव यांची प्रकृती गेल्या कित्येक दिवसांपासून बिघडली आहे. हृदयविकाराचा झटका आल्यामुळे कपिल देव यांच्यावर तात्काळ शस्त्रक्रिया करण्यात आली. आता त्यांची प्रकृती सुधारत आहे. मंगळवारी कुणीतरी कपिल देव यांच्या मृत्यूची बातमी सोशल मीडियावर पसरवली. 

सोशल मीडियावर कोणतीही बातमी अगदी वाऱ्यासारखी पसरते. बातमीची सत्यता न तपासता ती व्हायरल कली जाते. यामध्ये सेलिब्रिटींच्या निधनाची बातमी देखील असते. ऑलराऊंडर असलेले कपिल देव यांच्या निधनाची बातमी २ नोव्हेंबर रोजी व्हायरल झाली. 

काही दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल झालेल्या कपिल देव यांची निधनाची बातमी वाऱ्यासारखी पसरली. कपिल देव यांचे चाहते आणि क्रिकेटप्रेमींनी तर त्यांना आदरांजली देखील अर्पण केली. या सगळ्या गोष्टीने कपिल देव यांचे माजी सहखेळाडू मदनलाल यांनी ट्विट करू कपिल देव यांची प्रकृती उत्तम असल्याचं सांगितलं.