भारताचा ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंद इतिहास रचता रचता राहिला आहे. विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेतील अंतिम सामन्यात अव्वल मानांकित मॅग्नस कार्लसनने आर. प्रज्ञाननंदचा पराभव केला. दोन डाव अनिर्णित राहिल्यानंतर टायब्रेकर डावात मॅग्नस कार्लसनविने प्रज्ञाननंदला पराभूत करत पुन्हा एकदा वर्ल्ड चॅम्पियन ठरला आहे. मॅग्नस कार्लसन अन्नातून विषबाधा झाल्याने अस्वस्थ होता. मात्र त्या स्थितीतही त्याने आर. प्रज्ञानंदला चांगली झुंज दिली. दरम्यान आर. प्रज्ञाननंदचा पराभव झाला असला तरी त्याने मॅग्नस कार्लसनला चांगलंच झुंजवलं.
प्रज्ञाननंद जिंकला असता तर वर्ल्ड चेस चॅम्पिअनशिपचा खिताब जिंकणारा दुसरा भारतीय खेळाडू ठरला असता. अझरबैजानच्या बाकू येथे हा सामना पार पडला. तीन दिवस चाललेल्या या अंतिम सामन्यात 4 डावांनंतर निकाल लागला. 18 वर्षीय प्रज्ञाननंदने पहिल्या दोन्ही डावात 32 वर्षीय कार्लसनला कडवी झुंज दिली.
Magnus Carlsen is the winner of the 2023 FIDE World Cup!
Magnus prevails against Praggnanandhaa in a thrilling tiebreak and adds one more prestigious trophy to his collection! Congratulations!
Stev Bonhage #FIDEWorldCup pic.twitter.com/sUjBdgAb7a
— International Chess Federation (@FIDE_chess) August 24, 2023
दरम्यान याआधी झालेले दोन्ही डाव अनिर्णित राहिले होते. मंगळवारी पहिला डाव झटपट बरोबरीत सोडवला गेला होता. प्रज्ञाननंदने कार्लसनला 35 चालीतच डाव बरोबरीत सोडविण्यास भाग पाडले होते. तर दुसरा डावही अनिर्णित राहिला होता. 30 चालीनंतर दोघांनीही बरोबरी साधली होती. यानंतर आज सामना पार पडला आणि टायब्रेकर डावात निर्णय झाला. टायब्रेकर सामन्यात दोन डाव खेळण्यात आले. पहिल्या डावात प्रज्ञाननंदचा पराभव झाला. दुसरा डाव ड्रॉ झाल्याने कार्लसनला विजयी घोषित करण्यात आलं.
Praggnanandhaa is the runner-up of the 2023 FIDE World Cup!
Congratulations to the 18-year-old Indian prodigy on an impressive tournament!
On his way to the final, Praggnanandhaa beat, among others, world #2 Hikaru Nakamura and #3 Fabiano Caruana! By winning the silver… pic.twitter.com/zJh9wQv5pS— International Chess Federation (@FIDE_chess) August 24, 2023
प्रज्ञानंदने अंतिम फेरीत पोहोचताना जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या फॅबियानो काऊआनाचा पराभव केला होता. त्याची आई देखील यावेळी उपस्थित होती. दिग्गज बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद यांच्यानंतर विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचणारा तो देशातील भारतीय खेळाडू ठरला होता. तसंच 2024 मधील कँडिडेट्स स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे.
बुद्धिबळ विश्वचषक 2023 चा विजेता आज रॅपिड टायब्रेकरद्वारे निश्चित करण्यात आला. जागतिक बुद्धिबळ चॅम्पियनशिपमधील सुरुवातीचे सामने आज दोन वेगवान सामन्यांनी सुरू झाले. यादरम्यान दोन्ही खेळाडूंना 25+10 मिनिटे देण्यात येतात. पहिल्या डावात दोन्ही खेळाडूंकडे 25 मिनिटे असतात. पहिली चाल खेळण्यासाठी 10 सेकंद दिले जातात. पहिल्या रॅपिड गेमद्वारे विजेता निश्चित न झाल्यास 10 + 10 वेळेमर्यादेसह दुसरा डाव खेळला जातो.
दुसऱ्या डावात कोणताही निकाल न लागल्यास सामना तिसरा डाव खेळवला जातो. तिसऱ्या डावात, सामना 3+5 च्या वेळेत खेळला जातो. तीन सेटनंतरही निकाल लागला नाही, तर ब्लिट्झ गेमद्वारे विजेता निश्चित केला जातो. या फेरीत दोन्ही खेळाडूंना 3+2 ची वेळ मर्यादा दिली जाते.
रमेशबाबू प्रज्ञाननंद हा बुद्धीबळातील ग्रॅंडमास्टर आहे. भारतातील प्रतिभावंत बुद्धिबळ खेळाडू म्हणून त्याची ओळख आहे. प्रज्ञानंद 10 वर्षांचा असतानाच इंटरनॅशनल मास्टर बनला होता. तसंच 12 वर्षांचा असताना ग्रॅंडमास्टर झाला. कमी वयात अशी कामगिरी करणारा तो दुसरा खेळाडू ठरला होता.