Mandira Bedi On Cricketers: भारतात क्रिकेट सर्वाधिक लोकप्रिय खेळ आहे. या खेळाचे अनेक चाहते असून घराघरात यावर चर्चा होत असते. क्रिकेटपटूंचे चाहते खेळाडूंना देवाचा दर्जा देतात. अशी अनेक उदाहरणं समोर आहेत. यावरून या खेळाची लोकप्रियता समोर येते. मात्र अभिनेत्री आणि अँकर असलेल्या मंदिरा बेदी हीने केलेल्या आरोपामुळे एकच खळबळ उडाली आहे. मंदिरा बेदीने 2003 आणि 2007 मध्ये ICC क्रिकेट विश्वचषक, 2004 आणि 2006 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी आणि इंडियन प्रीमियर लीग सीझन 2 साठी अँकरिंग केले आहे. मंदिरा बेदी यांनी एका कार्यक्रमात धक्कादायक खुलासा केला आहे. मंदिरा बेदी सांगितलं की, 'जेव्हा ती क्रिकेटपटूंशी बोलायची तेव्हा ते टक लावून बघायचे.'
अभिनेत्री मंदिरा बेदी यांनी सांगितले होते की, "क्रिकेटपटू तिला अपमानित करायचे, जेव्हा ती प्रश्न करायची तेव्हा ती तिच्याकडे टक लावून पाहायचे. तसेच ही प्रश्न कशी करू शकते अशा नजरेने पाहायचे. क्रिकेटर्सच्या अशा वागण्यामुळे कधीकधी भीतीही वाटायची. पण ज्या चॅनलसाठी काम करत होती त्या वाहिनीने खूप साथ दिली." मंदिरा बेदीच्या मते खेळाडू आणि पॅनेलमधील सहकारी तिला स्पोर्ट्स अँकर म्हणून स्वीकारत नव्हते.
मंदिराने शांती (1994) मधून टेलिव्हिजन मालिकांमध्ये पदार्पण केले. यानंतर तिने औरत, हॅलो फ्रेंड्स, दुश्मन, जस्सी जैसी कोई नहीं, 'क्योंकी सास भी कभी बहू थी' आणि महाभारत यांसारख्या अनेक हिंदी टेलिव्हिजन मालिकांमध्ये काम केले. याशिवाय तिने फेम गुरुकुल, डील ऑर नो डील, फियर फॅक्टर इंडिया, जो जीता वही सुपर स्टार, फियर फॅक्टर: खतरों के खिलाडी आणि आय कॅन डू दॅट यासह अनेक रिअॅलिटी शोमध्ये भाग घेतला.
मंदिरा बेदी पतीचे गेल्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते 49 वर्षांचे होते. तिने 1999 मध्ये राज कौशल यांच्यासोबत लग्न केले होते. 2011 मध्ये मुलगा वीरला जन्म दिला आणि 2020 मध्ये चार वर्षांची मुलगी तारा हिला दत्तक घेतले आहे.