मास्टर ब्लास्टर सचिनची खवय्येगिरी! मिसळ दिसताच तुटून पडला, पाहा व्हिडीओ

व्वा! मिसळपाव मी कधीही खाऊ शकतो... म्हणत सचिननं मारला ताव पाहा व्हिडीओ

Updated: Dec 12, 2021, 05:52 PM IST
मास्टर ब्लास्टर सचिनची खवय्येगिरी! मिसळ दिसताच तुटून पडला, पाहा व्हिडीओ title=

मुंबई: महाराष्ट्रात मिसळीचं एक वेगळंच स्थान आहे. जिल्हा बदलला तरी मिसळीचं प्रेम तेच आहे. अगदी सर्वसामान्यांपासून ते सेलिब्रिटिंपर्यंत मिसळ म्हटलं की कुणाच्या तोंडाला पाणी सुटणार नाही असं नाही. मिसळ हा प्रत्येकाच्य़ा जिव्हाळ्याचा विषय आहे. अगदी सचिन तेंडुलकरच्याही आणि हे त्याने त्याच्या व्हिडीओमधून पुन्हा एकदा चाहत्यांना नकळत दाखवून दिलं. 

मैदानात आपल्या फलंदाजीनं विरुद्ध संघाला घाम फोडणाऱ्या सचिनचा एक अनोखा अंदाज पाहायला मिळाला. नेहमी गोलंदाजांवर आपल्या धडाकेबाज बॅटिंगने तुटून पडणारा सचिन तेंडुलकर चक्क आज मिसळीवर तुटून पडल्याचं पाहायला मिळालं. 

सचिनचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्य़े सचिन तेंडूलकर मिसळीवर ताव मारताना दिसत आहे. मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरने सोशल मीडियावर मिसळ खातानाचा व्हिडिओ शेअर केला.

यावेळी महाराष्ट्राची मिसळ पाव म्हणजे एक नंबर असल्याचं त्याने म्हटलं आहे. तसंच रविवार असो वा सोमवार मिसळ पाव मी कधीही खाऊ शकतो असं कॅप्शनही सचिनने दिलं आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या चाहत्यांनी यावर भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.