Master Blaster Sachin Tendulkar : क्रिकेटचा देव मानल्या जाणाऱ्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या (Sachin Tendulkar) नावावर क्रिकेटमधील सर्व विक्रम जमा आहेत. सचिन तेंडुलकरने क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी आजही त्याचे विक्रम अबाधित आहेत.
तब्बल २४ वर्ष क्रिकेटमध्ये योगदान देणाऱ्या सचिन तेंडुलकरने अनेक क्रिकेटमध्ये पिढ्या पाहिल्या. अनेक दिग्गज क्रिकेटपटूंबरोबर खेळण्याचा मान त्याला मिळाला. यातूनच सचिनने आपला ऑल टाईम संघ निवडला आहे. सचिनने निवडलेल्या Playing XI मध्ये जगभरातील सर्वोत्तम खेळाडूंना स्थान दिलं आहे. पण हा संघ निवडताना त्याने काही आश्चर्यचकित करणारे निर्णयही घेतले आहेत.
सचिन तेंडुलकरची सार्वकालीन Playing XI
सचिन तेंडुलकरने निवडलेल्या Playing XI मध्ये धडाकेबाज सलामीवीर वीरेंद्र सेहवाग, लिटिल मास्टर सुनील गावस्कर, भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली आणि फिरकी गोलंदाज हरभजन सिंग या भारतीय खेळाडूंना संधी दिली आहे.
सचिनच्या Playing XI मध्ये सलामीला त्याने सुनील गावस्कर आणि वीरेंद्र सेहवाग यांना पसंती दिली आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर त्याने वेस्ट इंडिजचा महान फलंदाज ब्रायन लाराला संधी दिली आहे. सर विवियन रिचर्डस हे सचिनच्या संघात चौथ्या क्रमांकाचे फलंदाज आहेत.
मधल्या फळीत या खेळाडूंना संधी
पाचव्या क्रमांकावर दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू जॅक कॅलिसला पसंती देण्यात आली आहे. तर भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार डावखुरा फलंदाज सौरव गांगुलीला सहाव्या क्रमांकासाठी संधी दिली आहे. संघात विकेटकिपर म्हणून सचिनने एसएस धोणीला न निवडता ऑस्ट्रेलियाच्या अॅडम गिलख्रिस्टला सातव्या क्रमांकाची जागा दिली आहे. विशेष म्हणजे भारताचा सध्याचा दिग्गज फलंदाज विराट कोहलीला सचिनच्या Playing XI मध्ये स्थान देण्यात आलेलं नाही.
संघात गोलंदाज म्हणून यांना स्थान
ऑस्ट्रेलियाचा महान लेग स्पिनर शेन वॉर्न सचिनच्या संघात आठव्या क्रमांकावर आहे. तर पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज वसीम अक्रम सचिनच्या Playing XI मध्ये नवव्या स्थानावर आहे. भारताचा स्पीन गोलंदाज हरभजन सिंग या संघात दहाव्या क्रमांकावर आहे. तर ऑस्ट्रेलियाचा सर्वात यशस्वी वेगवान गोलंदाज ग्लेन मॅकग्रा ११ व्या स्थानावर आहे.
कोहली-धोणी बाहेर
सचिन तेंडुलकरने आपल्या सार्वकालिन Playing XI मध्ये विराट कोहली आणि महेंद्र सिंग धोणीला स्थान न दिल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. धोणीच्या नेतृत्वात खेळताना भारतीय संघाने २०११ मध्ये विश्वचषक जिंकला होता. या संघात सचिन तेंडुलकरही होता. तर सचिनचे विक्रम तोडणाऱ्या फलंदाजांच्या यादीत विराट कोहली सर्वात पहिल्या स्थानावर आहे.
सचिन तेंदुलकरची ऑल टाईम Playing XI:
वीरेंद्र सहवाग, सुनील गावस्कर, ब्रायन लारा, विवियन रिचर्ड्स, जॅक कॅलिस, सौरव गांगुली, अॅडम गिलख्रिस्ट, शेन वॉर्न, वसीम अक्रम, हरभजन सिंह, ग्लेन मैक्ग्रा.