".....म्हणूनच मुंबई इंडियन्स किंग", सलग सात पराभवानंतरही क्रिकेट चाहते 'पलटण'च्या पाठीशी

मुंबईच्या या मोसमातील निराशाजनक कामगिरीनंतर सोशल मीडियावर टीमवर टीका करण्यात आली. अनेक मिम्सद्वारे खिल्ली उडवण्यात आली. मात्र काही चाहत्यांनी मुंबईच्या पाठीशी आम्ही कायम असल्याचं दाखवून दिलं.

Updated: Apr 22, 2022, 08:11 PM IST
".....म्हणूनच मुंबई इंडियन्स किंग", सलग सात पराभवानंतरही क्रिकेट चाहते 'पलटण'च्या पाठीशी title=

संजय पाटील, झी मीडिया, मुंबई : मुंबई विरुद्धच्या सामन्यात चेन्नईला विजयासाठी शेवटच्या बॉलवर 4 धावांची गरज होती. या अशा थरारक स्थितीत महेंद्रसिंह धोनीने शेवटच्या बॉलवर फोर मारत चेन्नईला सनसनाटी विजय मिळवून दिला. चेन्नईचा या मोसमातील हा दुसरा विजय ठरला. तर मुंबईला सलग सातव्या पराभवाचा सामना करावा लागला. (mi vs csk ipl 2022 mumbai indians 3 fans always his back after 7 consecutive lost)

मुंबईच्या या मोसमातील निराशाजनक कामगिरीनंतर सोशल मीडियावर टीमवर टीका करण्यात आली. अनेक मिम्सद्वारे खिल्ली उडवण्यात आली. मात्र काही चाहत्यांनी मुंबईच्या पाठीशी आम्ही कायम असल्याचं दाखवून दिलं.

या 3 क्रिकेटचाहत्यांनी स्टेडियममध्ये हातात फळक घेऊन मुंबईच्या पाठीशी कायम असल्याचं दाखवून दिलं. आम्ही कायम शेवटपर्यंत मुंबईचे समर्थक असणार, असा मेसेज या चाहत्यांनी या फलकातून दिलाय. तसंच मुंबईत राहून दुसऱ्या संघांना समर्थन देणाऱ्या चाहत्यांनाही खडेबोल सुनावले आहेत.

फलकात काय संदेश?

"अरे 2-6 काय घेऊन बसलात जरी 14 चे 14  सामने हरलो तरी शेवटपर्यंत मुंबई समर्थक असणार. दु:ख त्या आरसीबीला विचारा जे 14 चे 14 कप हरलेत", असं म्हणत या चाहत्यांनी आरसीबीला चिमटाही काढलाय. दरम्यान या क्रिकेट चाहत्यांचा फोटो सोशलला मीडियावर व्हायरल होतोय.