MI vs DC: पंतच्या या चुकीमुळे दिल्ली कॅपिटल्सचा पराभव, प्लेऑफ गाठण्याचे स्वप्न भंगले

Rishabh Pant On DRS: आईपीएलच्या 2022 (IPL)  69 व्या सामन्यानंतर, प्लेऑफचे चार संघ निश्चित झाले आहेत. गुजरात टायटन्स, राजस्थान रॉयल्स, लखनऊ सुपर जायंट्सनंतर आता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे. 

Updated: May 22, 2022, 08:02 AM IST
MI vs DC: पंतच्या या चुकीमुळे दिल्ली कॅपिटल्सचा पराभव, प्लेऑफ गाठण्याचे स्वप्न भंगले title=

मुंबई : Rishabh Pant On DRS: आईपीएलच्या 2022 (IPL)  69 व्या सामन्यानंतर, प्लेऑफचे चार संघ निश्चित झाले आहेत. गुजरात टायटन्स, राजस्थान रॉयल्स, लखनऊ सुपर जायंट्सनंतर आता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे. या चार संघांमध्ये विजेतेपदाची लढाई रंगणार आहे. 

या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सला पराभवाला सामोरे जावे लागले, त्यानंतर संघ यंदाच्या हंगामातून बाहेर पडला आहे. दिल्लीबाहेर होण्यामागचे सर्वात मोठे कारण म्हणजे कर्णधार ऋषभ पंत याची मैदानावरील मोठी चूक, या चुकीने संपूर्ण संघाला वेठीस धरले. 

पंतची चूक संघाला महागात पडली

दिल्ली कॅपिटल्ससाठी हा सामना करो या मरो असा होता. हा सामना जिंकून संघ प्लेऑफमध्येही प्रवेश करु शकला असता, पण ते स्वप्नच राहिले. या सामन्यात दिल्लीच्या पराभवामागे मुंबईचा फलंदाज टीम डेव्हिडचा सर्वात मोठा हात होता. टीम डेव्हिडने स्फोटक खेळी खेळली. पण कर्णधार ऋषभ पंतकडून मोठी चूक म्हणजे त्याने टीम डेव्हिडविरुद्ध डीआरएस न घेण्याची मोठी चूक केली, कारण डेव्हिड एकदा मॅचमध्ये क्लीन आऊट झाला होता, पण अम्पायरने त्याला आऊट दिले नाही.

रिव्ह्यु न घेण्याची मोठी चूक

शार्दुल ठाकूर मुंबई इंडियन्स (MI) डावातील 15 वे षटक करत होता. या षटकात शार्दुल ठाकूरने ऑफ स्टम्पच्या बाहेर टीम डेव्हिडला (Tim David) अप्रतिम बॉल टाकले आणि डेव्हिडने बॉल मारण्याचा प्रयत्न चुकला. हा बॉल टीम डेव्हिडच्या बॅटला स्पर्श करुन ऋषभ पंतच्या ग्लोव्हजमध्ये गेला, पण अम्पायरने आऊट दिले नाही. कर्णधार ऋषभ पंत अम्पायरच्या निर्णयाविरुद्ध रिव्ह्यु घेऊ शकला असता. पण तसे त्याने घेतले नाही. शार्दुल ठाकूर आणि ऋषभ पंत यांच्यातही चर्चा झाली पण रिव्ह्यू घेण्यात आला नाही. नंतर बॉल बॅटला लागल्याचे दिसून आले. 

टीम डेव्हिडची स्फोटक खेळी

टीम डेव्हिडने गेल्या काही सामन्यांमध्ये मुंबई इंडियन्ससाठी (MI) अनेक धडाकेबाज खेळी खेळल्या. या सामन्यात टीम डेव्हिडने 11 चेंडूत 34 धावांची स्फोटक खेळी खेळली आणि दिल्ली कॅपिटल्सकडून सामना हिसकावून घेतला. या खेळीत त्याच्या बॅटने 2 चौकार आणि 4 षटकार मारले होते. टीम डेव्हिडच्या या खेळीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने (MI) हा रोमहर्षक सामना 5 गडी राखून जिंकला.