IPL 2021 : मुंबई इंडियन्ससाठी आज 'करो या मरो', टीमला 'हे' जमलं तरच प्लोऑफमध्ये संधी, नाहीतर सगळंच संपलं...

केकेआरच्या प्लेऑफमध्ये पोहचणार की नाही हे आज मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील सामन्यानंतरच निश्चित होईल.

Updated: Oct 8, 2021, 01:30 PM IST
IPL 2021 : मुंबई इंडियन्ससाठी आज 'करो या मरो', टीमला 'हे' जमलं तरच प्लोऑफमध्ये संधी, नाहीतर सगळंच संपलं... title=

दुबई : IPL 2021 मध्ये, प्लेऑफचे 3 संघ (IPL 2021 Playoff) आधीच निश्चित झाले आहेत. यामध्ये चेन्नई सुपर किंग्ज, दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने आधीच आपले स्थान निश्चित केले आहे. त्याचवेळी, चौथा संघ म्हणून कोलकाता नाईट रायडर्सचे स्थान देखील जवळपास स्पष्ट झाले आहे. परंतु यावर अजूनही शिक्कामोर्तब झालेला नाही. कारण यासाठी प्रतीक्षा आहे ती आजच्या मॅचची.

केकेआरच्या प्लेऑफमध्ये पोहचणार की नाही हे आज मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील सामन्यानंतरच निश्चित होईल. परंतु त्यासाठी तुम्हाला जास्त वाट पाहण्याची देखील गरज नाही कारण टॉसदरम्यान हे सगळं आपल्याला स्पष्ट होईल.

मुंबई इंडियन्सला जिंकण्यासाठी काय करावं लागेल?

खरेतर प्लेऑफसाठी गरजेच्या असलेल्या आकडेवारीनुसार  मुंबई इंडियन्सला आज टॉस कोणत्याही परिस्थितीत जिंकायचचं आहे ते जर टीम हरली तर खेळ तेथेच संपणार. त्यामुळे टीमला टॉस हरण्यास मनाई आहे.

आज टीम ना टॉस गमावू शकतो ना सामना. जर मुंबईने नाणेफेक गमावली तर केकेआरला त्याच वेळी प्लेऑफचे तिकीट मिळेल आणि जर टीमेन टॉस जिंकला, तर त्यांची खरी परीक्षा तेथून सुरू होईल. कारण त्यानंतर टीमला आणि टीममधील खेळाडूंना स्वत:ला सिद्ध करावं लागेल. त्यांना असं काही करुन दाखवायचं आहे जे आजपर्यंत आयपीएलच्या इतिहासात कधीही घडलेलं नाही.

मुंबई इंडियन्सला टॉस जिंकून पहिलं फलंदाजी घ्यावी लागेल, ज्यासाठी त्यांना कमीतकमी 200 प्लस धावा कराव्या लागतील. कारण त्यापेक्षा कमी धावांना विचार करणे त्यांच्यासाठी शक्यच नाही. इतक्या धावा केल्यावर, त्यांच्या गोलंदाजांचा प्रयत्न असा असावा की, त्यांनी सनरायझर्सला इतक्या धावांवर ऑलआउट केले पाहिजे की दोन्ही संघांमधील विजयाचे अंतर किमान 171 धावा असावे. ही समीकरणे पूर्ण केल्यानंतरच मुंबई इंडियन्सचा संघ आज प्लेऑफसाठी पात्र होऊ शकेल. अन्यथा, कोलकाता नाईट रायडर्सला प्लेऑफ खेळण्याचा परवाना मिळेल.

आरसीबीचा पहिल्या दोनमध्ये जाण्याचा मार्ग

दुसरीकडे, आज एक सामना RCB आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात आहे. RCB प्लेऑफमध्ये आहे पण त्यांचा हा प्रयत्न आजचा सामना जिंकून पहिल्या दोन संघांमध्ये त्यांचे स्थान निश्चित करण्याचा असेल. कारण पहिल्या 2 मधील संघाला अंतिम फेरी गाठण्याच्या 2 संधी आहेत.

मात्र, रॉयल चॅलेंजर्ससाठीही हे काम प्लेऑफमध्ये मुंबई इंडियन्सला पोहोचण्याइतकेच कठीण आहे. त्याला आज दिल्ली कॅपिटल्सला किमान 163 धावांनी पराभूत करावे लागेल, त्यांना ही संधी मिळेल.