ENG vs AUS: मिचेल स्टार्कचा घातक यॉर्कर, मोईन अली चारीमुंड्या चीत; बॉल गोळीगत आला अन्... Video एकदा पहाच

England vs Australia, moeen ali Wicket: मोईल अली मैदानात आला. मात्र, त्याला केवळ 5 धावा करता आल्या. त्याच्या विकेटचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे.

Updated: Jul 9, 2023, 08:51 PM IST
ENG vs AUS: मिचेल स्टार्कचा घातक यॉर्कर, मोईन अली चारीमुंड्या चीत; बॉल गोळीगत आला अन्... Video एकदा पहाच title=
Moeen Ali bowled Video

Moeen Ali bowled Video: हेडिंग्ले येथे खेळल्या गेलेल्या महत्त्वाच्या अॅशेस मालिकेतील (Ashes 2023) तिसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडने ऑस्ट्रेलियाचा पराभव करून लाज राखली आहे. पहिल्या दोन सामन्यात कांगारूंकडून दारूण पराभव झाल्यानंतर तिसऱ्या सामन्यात गोरे इंग्रज जीव लावून खेळले. पहिल्याच सत्रात डाव गडगडल्यानंतर चौथ्या दिवशी इंग्लंड ऑस्ट्रेलियाने (England vs Australia) दिलेलं आव्हान पार करेल की नाही? असा सवाल उपस्थित केला जात होता. अशातच आता हॅरी ब्रुकच्या (Harry Brook) दमदार खेळीमुळे इंग्लंडने अॅशेसमध्ये लाज राखली आहे.

दुसऱ्या डावात इंग्लंडला सलामीच्या फलंदाजांकडून मोठी अपेक्षा होती. मात्र, झॅक क्रॉली आणि बेन डकेट लवकर बाद झाले. त्यानंतर मोईल अली मैदानात आला. मात्र, त्याला केवळ 5 धावा करता आल्या. त्याच्या विकेटचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे. 

नेमकं काय झालं?

मिचेल स्टार्क ऑस्ट्रेलियाकडून 14 वी ओव्हर टाकण्यासाठी आला. या षटकातील पाचव्या चेंडूवर त्याने मोईन अलीचा लेग स्टंप उखडला. बॉल एवढा परफेक्ट होता की मोईन अलीला काहीच समजले नाही. चेंडू आत आला आणि स्टंप उखडला. बॉल गोळीगत आला अन् स्टंप उडाला. मिचेल स्टार्कचा घातक यॉर्करमुळे मोईन अली चारीमुंड्या चीत झाल्याचं पहायला मिळालं.

पाहा Video

ऑस्ट्रेलियाकडून मिचेल मार्श (Mitchell Marsh) याने 118 धावांची शतकी खेळी साकारली होती. ऑस्ट्रेलियाच्या या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडने पहिल्या डावात 237 धावांवर समाधान मानले होते. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात 26 धावांची आघाडी मिळाली होती. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात 224 धावा केल्या. अशाप्रकारे इंग्लंडला विजयासाठी 251 धावांची गरज होती. इंग्लंडने हे आव्हान 3 गडी राखून पार केले आणि सामना जिंकला आहे.

आणखी वाचा - जॉनी बेअरस्टोने शिकवला कांगारूंना धडा, क्रीजवर असं काही केलं की... कॅरी सुद्धा खदाखदा हसला; पाहा Video

मिचेल स्टार्क (Mitchell Starc) याने भेदक गोलंदाजी करत 16 ओव्हरमध्ये 78 धावा खर्चून 5 विकेट्स घेतल्या. तर कर्णधार पॅट कमिन्स (Pat Cummins) आणि मिचेल मार्श यांनी प्रत्येकी 1 विकेट मिळाली. ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात मिशेल मार्शने 5 विकेट घेत ऑस्ट्रेलियाला गुडघ्यावर आणलं होतं. त्यानंतर आता स्टार्कने पाचचा पंच लगावला आहे.