नवी दिल्ली : भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी गेल्या काही दिवसांपासून आरोप, वादात अडकलाय.
पत्नी हसीन जहॉने त्याच्यावर अनैतिक संबंधांपासून ते मॅच फिक्सिंगपर्यंतचे गंभीर आरोप केले. दरम्यान शमीनेही बायकोवर धक्कादायक आरोप केले आहेत.
शमीने क्रिकेट विश्वातील यशानंतर हसीनसाठी कोट्यावधींचे फार्म हाऊस खरेदी केले. जे शमीच्या गावापासून १ किलोमीटर दूर आहे.
तर राष्ट्रीय महामार्गावरून अर्धा किलोमीटरच्या अंतरावर ते वसलेले आहे.
हे फार्म हाऊस हसीन आणि शमी दोघांच्याही नावावर आहे.
मात्र ते फक्त हसीनच्या नावे नसल्याने हसीन शमीवर काहीशी नाराज होती. त्यामुळे हे हार्म हाऊस या वादाचे कारण तर नाही ना ? अशी चर्चा आता रंगू लागली आहे. मात्र याला दुजोरा देणारे कोणतही माहिती समोर आलेली नाही.
आपल्या आधीच्या लग्नाबाबत हसीन जहाने मला अंधारात ठेवले असे शमीने सांगतिले.
तिला २ मुली आहेत याबद्दलही आपल्याला माहिती नसल्याचे शमीने सांगितले.
स्वत:च्या मुलींना तिने चुलत बहिणी असल्याचे सांगितल्याचा आरोपही शमीने केलाय. यामुळे सर्व प्रकरणाला वेगळ वळण मिळालयं
या वादात दिवसेंदिवस वाढ होत असतानाच हसीनने आता पोलीस सुरक्षा मागतील आहे.
ती शमीबद्दल खुलेपणाने बोलायला लागल्यापासून तिला सोशल मीडियावर धमक्या येऊ लागल्या आहेत, असे तिचे म्हणणे आहे. यासाठी तिने बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जींकडेही मदतीची याचना केली आहे.