अहमदाबाद : भारत आणि इंग्लंड यांच्यात चौथ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि इंग्लंडचा अष्टपैलू बेन स्टोक्स यांच्यात संघर्ष पाहायला मिळाला. इंग्लंडच्या पहिल्या डावात 13 व्या ओव्हरमध्ये बेन स्टोक्स आणि भारताचा गोलंदाज मोहम्मद सिराज यांच्यात शाब्दिक वाद झाला.
बेन स्टोक्सची ही गोष्ट विराट कोहलीला आवडली नाही. यानंतर हे दोन्ही खेळाडू आपसात भिडले. हे प्रकरण जसजसे वाढत गेले तसतसे पंचांनी दोन्ही स्टार खेळाडूंना शांत केले. स्टोक्स मात्र त्यानंतर ही गप्प झाला नाही. त्याने मोहम्मद सिराजला काही अपशब्द बोलण्यास सुरवात केली.
पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर जेव्हा सिराजला या घटनेबद्दल विचारले गेले तेव्हा तो म्हणाला की, ऑस्ट्रेलिया, भारत, मी जिथे जिथेही गोलंदाजी करतो तिथे गोलंदाजीवर मी 100% भर दिला. प्रत्येक बॉलवर मी स्वत: ला म्हणतो, 'बॉल राईट'. जेव्हा बेन स्टोक्सने मला शिवी दिली तेव्हा मी विराट भाईंना हे सांगितले. विराट भाईंनी पुन्हा हे प्रकरण हाताळले.
फिरकी ट्रॅकवर मोहम्मद सिराजने आपली वेगवान गोलंदाजी दाखविली. सामन्याच्या पहिल्या डावात त्याने 2 गडी बाद केले. सिराजने जॉनी बेअरस्टो आणि जो रूट सारख्या महत्त्वाच्या फलंदाजांना बाद केले. तो भारतीय फिरकीपटूंचा सहाय्यक म्हणून आज दिसला. त्याने अश्विन, अक्षर आणि सुंदर यांच्यावरचा ताण कमी केला.