सचिन तेंडुलकरची जंगल सफारी, सोशल मीडियावर शेअर केला व्हिडिओ

सचिनची ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाची सफारी

Updated: Mar 4, 2021, 06:19 PM IST
सचिन तेंडुलकरची जंगल सफारी, सोशल मीडियावर शेअर केला व्हिडिओ

चंद्रपूर : भारतरत्न सचिन तेंडुलकर चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या प्रेमात पडला आहे. सलग दुसऱ्या वर्षी ताडोबात आल्यानंतर त्याने व्याघ्र दर्शनाचा व्हिडिओ शेअर केला आहे. जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात त्याने ताडोबाची सफर केली होती. व्हिडिओ शेअर केल्यावर काही तासातच वन्यजीवप्रेमी आणि क्रीडा प्रेमींची या व्हिडीओला मोठी पसंती मिळाली. ताडोबात घालवलेल्या क्षणांचा आनंद घेत असतानाचा व्हिडिओ शेअर करत त्याने ताडोबात नक्की या असं आवाहन केलं आहे.

भारताचा माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकर आपल्या कुटुंबांसोबत २५ जानेवारीला ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात दाखल झाला होता. सचिन तेंडुलकर या व्याघ्र प्रकल्पाच्या चांगलाच प्रेमात पडला आहे. येथील निसर्गाचं सौंदर्य त्याच्या मनात घर करुन गेलं. हा खूपच वेगळा अनुभव असल्याचं सचिनने म्हटलं आहे. 

३ मार्चला रात्री हा व्हिडिओ शेअर केल्यानंतर काही मिनिटातच या व्हिडिओला हजारो लाईक्स मिळाले. त्याच्या अनेक चाहत्यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे.