रडू-रडून या बॉलरची झाली होती वाईट अवस्था, 'विराटभाईच्या त्या एका वाक्यानं माझं आयुष्य बदललं'

वडिलांच्या जाण्यानं कोलमडलेल्या मोहम्मद सिराजला विराट कोहलीनं सावरलं. त्याच्या एका वाक्यनं पुन्हा एकदा जगण्याची नवी उमेद निर्माण केली. 

Updated: May 12, 2021, 04:02 PM IST
रडू-रडून या बॉलरची झाली होती वाईट अवस्था, 'विराटभाईच्या त्या एका वाक्यानं माझं आयुष्य बदललं' title=

मुंबई: टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने कमी कालावधीतच यशाचं शिखर गाठलं. सिराजने आतापर्यंत भारताकडून 5 कसोटी, 3 आंतरराष्ट्रीय टी -20 आणि वन डे सामने खेळले आहेत. मोहम्मद सिराजच्या आयुष्यात एक काळ असा आला होता की त्यावेळी पूर्ण कोलमडून गेला होता. त्यावेळी टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीनं त्याला साथ दिली सावरलं आणि पुन्हा त्याला आपल्या करियरमध्ये यश मिळवण्यासाठी बळ दिलं.

किंग कोहलीनं दिली साथ
गेल्या वर्षी मोहम्मद सिराजच्या वडिलांचं निधन झालं. त्यावेळी सिराज टीम इंडियाकडून खेळत होता. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असल्यामुळे त्याला कोरोनाच्या कठोर नियमांमुळे त्याला वडिलांच्या अंत्यदर्शनासाठी भारतात येण्य शक्य नव्हतं. अशा परिस्थितीत सिराज पडूपणे कोलमडून गेला होता. वडिलांच्या जाण्यानं तो हादरून गेला. हॉलेजच्या रूममध्ये तो खूप रडत होता. त्यावेळी त्याला टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीनं सावरलं. 

टाइम्स ऑफ इंडियाला सिराजने दिलेल्या मुलाखतीमध्ये त्याने सांगितलं की, मला आठवतंय मी हॉटेलच्या खोलीत खूप रडत होतो. विराटभाईने मला घट्ट मिठी मारली आणि सावरलं. मी तुझ्यासोबत आहे, काळजी करू नकोस! असंही विराटभाई त्यावेळी म्हणाले. 

वडिलांना गमवलं या गोष्टीमुळे माझी अवस्था खूप वाईट झाली होती. मात्र विराट कोहलीने मला सावरलं. त्या परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी त्याने मला साथ दिली. माझ्या करियरमध्ये आज जो काही मी यशस्वी आहे तो विराटभाईमुळे असं म्हणत आपल्या यशाचं श्रेय सिराजनं कोहलीला दिलं आहे. 

ऑस्ट्रेलियाच्या दौर्‍यावर मोहम्मद सिराजने कसोटी सामन्यात पदार्पण केले. यावर्षी आयपीएलच्या पूर्वार्धातही सिराज उत्कृष्ट फॉर्ममध्ये होता. सिराजने 7 सामन्यांत 6 गडी बाद केले. 

'विराटभाई नेहमी म्हणतो की तुझ्याकडे जी खेळण्य़ाची प्रतिभा आहे त्याचा वापर करून तू कोणत्याही फलंदाजाला कोणत्याही विकेटवर अडचणीत आणू शकतो. विराटभाईने मला कायमच साथ दिली आहे. तो नेहमीच माझ्यासाठी सर्व परिस्थितीत असतो' असंही सिराज यावेळी म्हणाला.