तुम्हाला माहितय का IPL मध्ये सर्वात जास्तवेळा शून्यवर कोण आऊट झालंय?

IPL मधील सर्वात लाजीरवाणा विक्रम, Most Ducks In IPLच्या यादीत पहिला कोण पाहा...नावं पाहात तर थक्क व्हाल

Updated: Mar 19, 2022, 05:34 PM IST
तुम्हाला माहितय का IPL मध्ये सर्वात जास्तवेळा शून्यवर कोण आऊट झालंय? title=

मुंबई : आयपीएलचे सामने 26 मार्चपासून सुरू होत आहेत. पहिला सामना चेन्नई विरुद्ध कोलकाता होणार आहे. सगळे संघ आपल्या तयारीमध्ये व्यस्त आहेत. फक्त एक आठवडा या सर्वांकडे शिल्लक राहिला आहे. 10 संघ 70 सामने आणि एक ट्रॉफी कोण नाव कोरणार याकडे लक्ष आहे. 

आयपीएलमध्ये आतापर्यंत अनेक रेकॉर्ड्स झाले आहेत. सर्वात लांब सिक्स, सर्वात जास्त धावा, ऑरेंज कॅप असे अनेक रेकॉर्ड्स आहेत. मात्र एक रेकॉर्ड असा आहे जो अत्यंत लाजीरवाणा आहे. शून्यवर आऊट होण्याचा रेकॉर्ड. सर्वात जास्त आयपीएलमध्ये शून्यवर आऊट झालेल्या क्रिकेटपटूंची लिस्ट आज आपण जाणून घेणार आहोत. 

सर्वात जास्त शून्यवर आऊट होण्याचा विक्रम पहिल्यांदा पीयूष चावलाने केला होता. आतापर्यंत 13 वेळा शून्यवर आऊट झाला आहे. तर रोहित शर्माच्या नावावरही हा विक्रम आहे. अजिंक्य रहाणे, अंबाती रायडू सारखे खेळाडू लांब शॉर्ट मारण्याच्या नादात आऊट होतात. 
पीयूष चावला- 13 
हरभजन सिंह- 13 
पार्थिव पटेल- 13 
अजिंक्य रहाणे- 13 
अंबती रायडू- 13 
रोहित शर्मा- 13 

आयपीएल 2022 अनेक अर्थानं वेगळा असणार आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये शून्यवर आऊट कोण होणार? याकडे चाहत्यांचं लक्ष असणार आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये 10 संघ आहेत. गुजरात आणि लखनऊ दोन नवे संघ आले आहेत. तर अनेक उत्तम खेळाडू आणि जोड्या फुटल्या आहेत. 

यंदाचं आयपीएल अनेक अर्थानं वेगळं असणार आहे. यंदाच्या आयपीएलचा टायटल स्पॉन्सर टाटा आहे. मुंबईतील 3 तर पुण्यात एका स्टेडियमवर आयपीएलच्या सामन्याचं आयोजन करण्यात आलं आहे.