धोनीची पाणीपुरी आणि पियुष चावला, आरपी सिंगला घाई

महेंद्रसिंग धोनी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर सक्रीय असतो. त्यामुळे तो त्याच्याविषयीचे बरेचसे अपडेट इन्स्टाग्राम

Updated: Feb 6, 2020, 07:11 PM IST

माले : महेंद्रसिंग धोनी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर सक्रीय असतो. त्यामुळे तो त्याच्याविषयीचे बरेचसे अपडेट इन्स्टाग्राम, फेसबुकच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर करतो. सध्या धोनी मालदीवमध्ये सुट्टी एन्जॉय करतोय. याचे काही फोटो आणि व्हिडीओही तो चाहत्यांसोबत शेअरही तरतोय. त्यातच सध्या त्याचा पाणीपुरीचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. 

या व्हिडीओमध्ये त्याच्यासोबत क्रिकेटपटू पियुष चावला आणि माजी क्रिकेटपटू आरपी सिंगही आहे. या दोघांना धोनी त्याच्या स्वत:च्या हाताने पाणीपुरी तयार करुन देतांना या व्हिडिओमध्ये दिसतोय. 

या व्हिडीओमध्ये आरपी सिंह मुद्दाम धोनीला पाणीपुरी लवकर देण्याची घाई करत आहे. तर धोनीदेखील पहिल्यांदाच असं काम करत असल्यामुळे थोडावेळा थांब, वेळ लागेल असं म्हणताना दिसतोय.