जडेजाच्या अंगावर धावून गेला धोनी

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा नेहमीच त्याच्या मैदानातल्या शांत स्वभावामुळे ओळखला जातो.

Updated: May 14, 2018, 05:55 PM IST
जडेजाच्या अंगावर धावून गेला धोनी title=
फोटो सौजन्य : आयपीएल

पुणे : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा नेहमीच त्याच्या मैदानातल्या शांत स्वभावामुळे ओळखला जातो. पण आयपीएलमध्ये खेळताना चेन्नईच्या कर्णधाराचं वेगळं रुप पाहायला मिळालं. हैदराबादविरुद्धच्या मॅचमध्ये विकेट कीपिंग करताना धोनी त्याचा सहकारी जडेजाच्या अंगावर धावून गेला. धोनी अंगावर धावून आल्यानंतर जडेजा मात्र चांगलाच घाबरला. जडेजावर रागावून नाही तर फक्त त्याला घाबरवण्यासाठी धोनी त्याच्या अंगावर धावून गेला होता. धोनीचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हैदराबादची बॅटिंगची ७वी ओव्हर सुरू होती. हरभजनच्या बॉलिंगवर शिखर धवननं मिड विकेटला एक रन काढली. त्याठिकाणी कोणताच खेळाडू फिल्डिंगला नसल्यामुळे धोनीनं धावत जाऊन बॉल पकडला. यावेळी जडेजा तिकडे आला असताना धोनीनं अंगावर जाऊन जडेजाला घाबरवलं.

अंबाती रायडूचं शतक

अंबाती रायडूच्या नाबाद १०० रनच्या जोरावर चेन्नईनं हैदराबादचा ८ विकेटनं पराभव केला. या विजयाबरोबरच चेन्नईनं प्ले ऑफमध्ये प्रवेश केला आहे. हैदरबादची टीम याआधीच प्ले ऑफला पोहोचली आहे. दोन वर्षानंतर आयपीएलमध्ये पुनरागमन करणाऱ्या चेन्नईनं ९व्यांदा प्ले ऑफमध्ये प्रवेश केला आहे. रायडूचं आयपीएलमधलं हे पहिलं शतक आहे. तर शेन वॉटसननं या मॅचमध्ये ५७ रनची खेळी केली. कर्णधार महेंद्रसिंग धोनीनं नाबाद २० रन केल्या.