मुंबई इंडियन्सने मलिंगासह या ७ खेळाडूंना केलं बाहेर

इंडियन प्रीमियर लीगमधील टीम मुंबई इंडियन्सने यंदा कायम ठेवलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे.

Updated: Jan 20, 2021, 10:06 PM IST
मुंबई इंडियन्सने मलिंगासह या ७ खेळाडूंना केलं बाहेर title=

मुंबई : इंडियन प्रीमियर लीगमधील टीम मुंबई इंडियन्सने यंदा कायम ठेवलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. या संघाने यावर्षी अनुभवी वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाला संघात घेतलेलं नाही. यासह, जेम्स पॅंटीनसन आणि नॅथन कूल्टर नाईल यांनाही यादीत स्थान मिळालेले नाही.

मागील वर्षी कोरोना साथीच्या साथीचा प्रादुर्भाव झाल्याने युएईमध्ये आयपीएल आयोजित करण्यात आला होता. मलिंगाने वैयक्तिक कारणास्तव स्पर्धेतून माघार घेतली. कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे त्याने कुटुंबासमवेत रहाण्याचे ठरविले. गेल्या मोसमात शानदार प्रदर्शन करणाऱ्या सूर्यकुमार यादव व्यतिरिक्त सौरव तिवारी आणि वेगवान गोलंदाज धवल कुलकर्णी यांनाही संघाने कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

रोहित शर्मा, क्विंटन डी कॉक, सूर्यकुमार यादव, ईशान किशन, ख्रिस लिन, अनमोलप्रीत सिंग, सौरव तिवारी, आदित्य तरे, किरोन पोलार्ड, हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या, सुचित रावल, जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट, राहुल चहर, जयंत यादव, धवल कुलकर्णी, मोहसीन खान यांना संघात कायम ठेवण्यात आलं आहे.

तर लसिथ मलिंगा, मिशेल मॅकक्लेनाघन, जेम्स पॅटिनसन, नॅथन कोल्टर नाईल, सेरफेन रदरफोर्ट, प्रिन्स बलवंत राय, दिग्विजय देशमुख यांना रिलीज करण्यात आलं आहे.