मुंबई : दिल्ली कॅपिटल संघाने आयपीएल 2020 च्या मिनी लिलावापूर्वी एकूण 6 खेळाडूंना रिलीज केले आहे. ज्यात चार परदेशी आणि दोन भारतीय खेळाडूंचा समावेश आहे. भारतीय खेळाडूंमध्ये मोहित शर्मा आणि तुषार देशपांडे यांना दिल्ली संघातून बाहेर बाहेर करण्यात आलं आहे, तर परदेशी खेळाडूंमध्ये किमो पॉल, संदीप लामिछाने, अॅलेक्स कॅरी आणि जेसन रॉय यांना दिल्लीमधून वगळण्यात आले आहे.
श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात आयपीएल 2020 मध्ये दिल्ली संघाने चांगली कामगिरी केली आणि टीमही प्लेऑफमध्ये पोहोचली. या संघानेही अंतिम फेरी गाठली होती, परंतु मुंबई इंडियन्सकडून त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. दिल्ली संघाने जाहीर केलेल्या खेळाडूंमध्ये कोणतेही मोठे नाव समाविष्ट नाही. या संघाने आपल्या बर्याच खेळाडूंवर विश्वास दर्शविला आहे आणि त्यांना संघात कायम ठेवले आहे.
शिखर धवन, पृथ्वी शॉ, अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत, कर्णधार श्रेयस अय्यर आणि अक्षर पटेल यांचा समावेश दिल्लीच्या टीममध्ये आहे. अनुभवी फिरकीपटू अमित मिश्राला संघात कायम ठेवण्यात आले आहे, तर वेगवान गोलंदाज इशांत शर्मा गेल्या हंगामात दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडला होता. त्याचा ही संघात समावेश आहे. अनुभवी फिरकी गोलंदाज आर अश्विनलाही संघात कायम ठेवण्यात आले आहे.
वेगवान गोलंदाजांमध्ये कॅगिसो रबाडा, एनिच नॉर्थजे संघात कायम आहेत तर संघाने हेटमीयर, मार्कस स्टायन्स आणि ख्रिस वॉक्सवर विश्वास दाखवला आहे.
शिखर धवन, पृथ्वी शॉ, अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, अमित मिश्रा, इशांत शर्मा, आर अश्विन, ललित यादव, अवेश खान, प्रवीण दुबे, कॅगिसो रबाडा, एनिच नॉर्टजे, मार्कस स्टॉयनिस, शिमरॉन हेटमीयर, ख्रिस वॉक्स .
केमो पॉल, संदीप लामिछाने, अॅलेक्स कॅरी, जेसन रॉय, मोहित शर्मा, तुषार देशपांडे यांना संघातून वगळण्यात आले आहे.