MI vs RCB Match Preview Playing XI Head Records Pitch Report: इंडियन प्रिमिअर लीग स्पर्धेत आज होणारा 25 वा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होत असून या सामन्यामध्ये यजमान मुंबई इंडियन्सचा संघ आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा संघ आमने-सामने येणार आहे. पॉइण्ट्स टेबलच्या तळाकडील संघांमध्ये समावेश असलेले हे दोन्ही संघ पॉइण्ट्स टेबलमधील आपली कामगिरी सुधारण्याच्या दृष्टीनेच मैदानात उतरतील. या दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग इलेव्हन कशी असू शकते? दोन्ही संघ एकमेकांविरोधात नेमके किती सामने खेळले आहेत? दोन्ही संघांचा वानखेडेमधील रेकॉर्ड काय सांगतो हे पाहूयात...
मुंबई इंडियन्सच्या संघाने सलग 3 सामन्यांमध्ये पराभव झाल्यानंतर चौथा सामना जिंकण्यात हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखालील संघाला यश आलं. मुंबईचा संघ पॉइण्ट्स टेबलमध्ये आठव्या स्थानी आहे. आरसीबीच्या संघाला कामगिरीमध्ये सातत्या राखता आलेलं नाही. 5 पैकी 4 सामने गमावलेला आरसीबीचा संघ पॉइण्ट्स टेबलमध्ये 9 व्या स्थानी आहे. मुंबई इंडियन्सची स्पर्धेला अडखळती सुरुवात झाली. गुजरात, हैदराबाद आणि राजस्थानच्या संघाकडून पराभूत झाल्यानंतर मुंबईने दिल्लीविरुद्धचा सामना जिंकला. मुंबईच्या संघाने 234 धावांपर्यंत मजल मारत दिल्लीला धूळ चारली. रोहित शर्मा, इशान किशन, टीम टेव्हीड आणि रोमारिओ शेफर्डने या सामन्यात तुफान फलंदाजी केली. गोलंदाजांपैकी जसप्रीत बुमराह आणि गेराल्ड क्रोर्त्झीने उत्तम गोलंदाजी केली.
दुसरीकडे विराट कोहलीची फलंदाजी वगळता आरसीबीसाठी मागील काही सामन्यांमध्ये एकही गोष्ट मनासारखी घडलेली नाही. राजस्थानविरुद्ध विराटने दमदार शतक झळकावलं. मोहम्मद सिराज वगळता कोणताही गोलंदाज प्रभावी ठरला नाही. फिरकी गोलंदाजांचा आभाव प्राकर्षाने जाणवून आला. आज सांघिक कामगिरीच्या जोरावर मुंबईला पराभूत करण्याचा आरसीबीचा मानस असेल.
मुंबई आणि बंगळुरुचा संघ एकूण 34 वेळा आमने-सामने आले आहेत. यापैकी मुंबईने 20 तर आरसीबीने 10 सामने जिंकले आहेत.
विशेष म्हणजे मुंबईविरुद्ध झालेल्या मागील 5 सामन्यांपैकी 4 सामने आरबीसीने जिंकले आहेत. यामध्ये वानखेडे स्टेडियमवरच आरबीसीने अवघ्या 16.4 ओव्हरमध्ये 200 धावांचं लक्ष्य गाठलेल्या सामन्याचाही समावेश आहे.
वानखेडेची खेळपट्टी ही फलंदाजीसाठी नंदनवन मानली जाते. येथील सीमारेषा तुलनेनं लहान आहे. खेळपट्टी सपाट आहे. फलंदाजांना मदत करणाऱ्या खेळपट्टीवर धावांचा पाऊस पडू शकतो असा एक अंदाज आहे. या खेळपट्टीवर वेगवान गोलंदाजांना आपल्या कौशल्याबरोबरच चतुर्याने गोलंदाजी करावी लागेल. फिरकी गोलंदाजीला ही खेळपट्टी साथ देते.
इशान किशन (विकेटकीपर), रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), टीम डेव्हिड, मोहम्मद नबी, रोमॅरियो शेफर्ड, जेराल्ड कोएत्झी, पीयूष चावला, जसप्रीत बुमराह.
सबस्टीट्यूट - क्वेना मफाका, नमन धीर, शम्स मुलाणी, आकाश मधवाल, नेहल वढेरा
विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (कर्णधार), ग्लेन मॅक्सवेल, सौरव चौहान, कॅमेरॉन ग्रीन, रजत पाटीदार, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), रीस टोपले, मयंक डागर, मोहम्मद सिराज, यश दयाल.
सबस्टीट्यूट - सुयश प्रभुदेसाई, महिपाल लोमरोर, हिमांशू शर्मा, विजयकुमार विशक, स्वप्नील सिंग
सामना कुठे - वानखेडे स्टेडियम, मुंबई
किती वाजता - सायंकाळी 7.30 वाजता प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात होईल.
टीव्ही चॅनेल - स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर
लाइव्ह वेबकास्ट - जिओ सिनेमा अॅपवर