मुंबई : इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात बुधवारी झालेल्या सामन्यात एक विचित्र घटना घडली. आयसीसी वर्ल्डकपमधील सामना पाहण्य़ासाठी पोहोचलेल्या प्रेक्षकांना ही घटना हैराण करणारी ठरली. सामन्याच्या दरम्यान न्यूझीलंडच्या बॅटींगदरम्यान ३४ व्या ओव्हरमध्ये एक व्यक्ती अचानक नग्न अवस्थेत मैदानात पोहोचला. सुरक्षा रक्षकांनी त्याला अडवण्याचा प्रयत्न केला पण तो त्यांच्या हातातूनही निसटला.
न्यूझीलंडची बॅटींग सुरु असताना तो मैदानात पळत होता आणि सुरक्षा रक्षक त्याला पकडण्यासाठी धावत होते. ५ मिनिटं त्याला पकडण्याची कवायत सुरु होती. हा व्यक्ती पिचवर पोहोचला आणि तेथे डान्स करु लागला.
या दरम्यान न्यूझीलंडचे टॉम लाथम आणि मिचेल सेंटनर आणि इंग्लंडचे खेळाडू मैदानावर ही सर्व घटना पाहत होते. शेवटी सुरक्षा रक्षकांनी त्याला पकडलं आणि त्याला कपड्यांनी झाकलं.
Well this went well. #CWC19 @RiversideDurham #EngvNl #streaker pic.twitter.com/3K0MVNrNcW
— Just Beef (@Ajk316) July 3, 2019
या व्यक्तीने सुरक्षा रक्षकांना चांगलंच पळवलं. या दरम्यान सामना काही काळासाठी थांबला होता. शेवटी त्याला कपड्यांनी झाकून मैदानाबाहेर घेवून गेले. इंग्लंडने मंगळवारी न्यूझीलंडचा ११९ रनने पराभव केला. आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप २०१९ च्या सेमीफायनलमध्ये त्यांनी आपली जागा निश्चित केली आहे.
इंग्लंडने १९९२ नंतर २७ वर्षांनी वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये धडक दिली आहे. या वर्ल्डकपमध्ये सेमीफायनलमध्ये पोहचणारी इंग्लंड तिसरी टीम ठरली आहे. ऑस्ट्रेलिया आणि भारत याआधी सेमीफायनलमध्ये पोहोचले आहे.